Madhya Pradesh Crime News: हुंड्यासाठी महिलेचा शाररिक आणि मानसिक छळ, कंटाळून उचलले टोकाचे पाऊलं, सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका महिलेने सासरच्या लोकांना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Madhya Pradesh Crime News: हुंडा बळी हे प्रकरण थांबायचे नाव घेतच नाही. दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) येथे एका महिलेने सासरच्या लोकांना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ३२ वर्षीय महिलेच्या आत्महत्या प्रकरणी कोलार पोलिसांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीच्या शोधात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलार येथील काजलीखेडा भागात सासरच्या घरात महिलेने गळफास लावून घेतली. आत्महत्या नंतर पोलिसांनी या घटनेची तपासणी केली. तपासणी दरम्यान सासरच्या मंडळीकडून महिलेचा हुंड्यासाठी छळ व्हायचा. महिलेचा पती अश्विनी सिंग आणि मेव्हणा शिवेंद्र सिंग यांनी हुंडा म्हणून ३ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर महिलेच्या माहेराकडून एका कारची मागणी केली. या गोष्टीची महिलेने नकार दिल्याने रोज मारहाण आणि शिवीगाळ करायचे अशी माहिती माहेरच्या लोकांनी पोलिसांना दिली. उर्मिला असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी घरी कोणी नसताना महिलेने टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर सासरचे मंडळी फरार आहे. उर्मिलाच्या माहेरच्यांनी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास विनंती केली. आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती एसीपी रघुवंशी यांनी सांगितले. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.