IPL Auction 2025 Live

Jaipur: डाॅक्टरांचा निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू; जयपुरच्या नामांकित हाॅस्पिटलवर आरोप

या संदर्भात लवकरत आरोग्य विभाग अहवाल सादर करेल. आरोग्य विभागातील तीन कमिटी यावर काम करत आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Jaipur: जयपुर शहरातील नामांकित फोर्टीस हाॅस्पिटलवर एका कुटूंबियाने आरोप टाकला आहे. डाॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डाॅक्टरच्या हलगरजीपणामुळे रुग्णाच्या शरिरात सर्जिकल कात्री राहीली  आ्णि त्यांचा अकास्मत मृत्यू झाला. मानसरोवर येथील शर्मा कुटूंबीयांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हाॅस्पिटलवर तक्रार केली. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव उपेंद्र शर्मा  (74) असे आहे. गेल्या महिन्या उपेंद्र शर्मा यांनी ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्याचा मुलगा कमल आणि कुटूंबाच्या माहितीनुसार उपेद्र यांना काही त्रास असल्यामुळे डाॅक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि इतर उपचार सुरु ठेवले.

त्यांच्यावर 30 मे रोजी डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केली. आणि डाॅक्टरच्या सांगण्यानुसार 31 मे रोजी त्यांना घरी देखील सोडण्यात आले. दोन दिवसांनी उपेंद्र यांनी प्रकृती पुन्हा खराब झाली, डाॅक्टारासोबत विचारपुस केल्या नंतर त्यांनी सगळं ठिक असल्याचे सांगितले. हेही वाचा - डाॅक्टरांच्या निष्काळजीमुळे मृत्यु ;

अचानक त्यांची प्रकृती खराब झाली  आणि 12 जूण रोजी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियानी त्यांच्या वर अंत्यसंस्कार केले. दरम्यान त्यांच्या मुलाला स्मशान भूमीत जेथे उपेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाले  तेथे सर्जिकल कात्री सापडली. कमल यांनी कुटूंबियाना हा प्रकर सांगितला. शस्त्रक्रिया केल्या नंतर बारा दिवसांनी उपेंद्र यांचा मृत्यू झाला.  ही घटना समोर आल्यावर डाॅक्टरांनी हात झटकले.

तेथील विभागीय संचालक निरव बनसल यांनी शर्मा कुटूंब खोटा आरोप केल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून तपासणी चालू आहे. आरोग्य विभागाने तीन कमिटी बसवली आहे. लवकरच ह्या संर्दभात अहवाल सादर केला जाईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.