रामदेव बाब यांच्या Patanjali समूहाने Coronil च्या विक्रीतून केवळ 4 महिन्यांत कमावले तब्बल 241 कोटी
कोरोनावरील ओषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळ प्रयोग सुरु आहेत.
कोरोना माहामारीने (Coronavirus Pandemic) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनावरील ओषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळ प्रयोग सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या पंतजली (Patanjali) समूहाने चार महिन्यांपूर्वी कोविड-19 आजारावर कोरोनिल (Coronil) या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती. या चार महिन्यात कंपनीने 85 लाखांपेक्षा अधिक कोरोनिल किटची विक्री केली असून अंदाजे 241 कोटी कमावले आहेत. कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 23 जूनपासून तर, 18 ऑक्टोबरपर्यंत एकूण 23 लाख 54 हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
रामदेव बाबा आणि ‘पतांजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी 23 जूनला या औषधाची घोषणा केली होती. या औषधात अश्वगंधा, गुळवेल, श्वासा, तुळशी, अशा वनौषधींचा समावेश आहे. प्रत्येक कोरोनिल किटमध्ये तीन औषध देण्यात आली आहे. ज्यात दोन औषध टॅबलेट तर, एक द्रव स्वरुपात आहे. हे औषध ‘पतंजली’च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जात आहे. या औषधाची किंमत 545 रुपये ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा- Covaxin Update: Bharat Biotech ची कोविड 19 वरील संभाव्य लस 2021च्या दुसर्या तिमाही मध्ये लॉन्च होण्याची शक्यता
पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे. जी मोठ्या प्रमाणात हर्बल-प्राकृतिक जलद गतीशील वस्तू आणि आयुर्वेदिक औषधे तयार करते. याची स्थापना योग-गुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांनी 2006 मध्ये केली होती.