Kerala TTE Pushed out of Running Train: तिकीट विचारलं म्हणून प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून तिकीट एक्झामिनिरला फेकलं; तिकीट एक्झामिनिरचा मृत्यू

त्यावर प्रवाशाने संतापाच्या भरात धावत्या ट्रेनमधून एक्झामिनिरला धक्का दिल्याची घटना घडली. या घटनेत एक्झामिनिरचा मृत्यू झाला आहे.

Train | (Photo Credits: X)

Kerala TTE Pushed out of Running Train: रागाच्या भरात लोक काय करतील काय सांगता येत नाही. केरळ (Kerala )मध्ये तर एका प्रवाशाने रेल्वे एक्झामिनिर(TTE)ला रेल्वेमधून फेकल्याचा धक्कादायक(Shocking) प्रकार घडला आहे. पाटणा सुपरफास्ट ट्रेन(Patna Superfast Train )मध्ये मंगळवारी ही घटना घडली. या घटनेत एक्झामिनिरचा जागीच (Kerala Crime News) मृत्यू झाला आहे. ही घटना संध्याकाळी सात वाजता घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा:Consumer Court Fines Kolkata Restaurant: बियर आणि पाण्यावर जास्त पैसे आकारणे कोलकातामधील रेस्टॉरंटला पडले महागात; ग्राहक न्यायालयाने ठोठावला दंड )

मुलंगुन्नाथुकावू आणि वडक्कनचेरी रेल्वे स्थानकादरम्यान एर्नाकुलम-पाटणा एक्स्प्रेसच्या एस 11 कोचमध्ये ई के विनोद हे प्रवाशांचे तिकीट तपासात होता. त्या दरम्यान, प्रवाशाचा एक्झामिनिरसोबत वाद झाला. रागात प्रवाशाने टीसीला धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. (हेही वाचा:BYJU Layoffs 2024: आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसने १,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ )

यामध्ये ई के विनोद यांचा मृत्यू झाला आहे. तर, आरोपी हा प्राथमिक तपासामध्ये ओडिशातील स्थलांतरित मजूर असल्याचे समजत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.