PAN-Aadhaar Link: पॅनकार्ड आधारला जोडण्याच्या मुदतीत वाढ

पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु, यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

पॅनकार्डला (PAN) आधार (Aadhaar) जोडण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु, यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. यामुळे ज्या नागरिकांनी पॅनकार्ड आधारला जोडले नाही, अशा नागरिकांना आणखी एक संधी मिळणार आहे. आधारला पॅनकार्डशी न जोडणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार आहे, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. यातच सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजने आधारकार्ड आणि पॅनकार्डला जोडण्याची मुदतीत वाढ करुन नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

पॅन-आधार कार्ड जोडण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2019 पर्यंत आहे, असे प्राप्तिकर विभागाने सांगितले होते. परंतु अंतिम तारखेत बदल करुन सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.  जर तुम्ही पॅनकार्डला आधारशी जोडणी केली असेल तर, तुम्हाला एक नोटीफिकेशन येईल, असेही सांगण्यात आले होते. पॅनकार्ड हे अतिशय महत्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जाते. तसेच भविष्यात याचा योग्य वापर करता यावा म्हणून सरकारकडून पॅन-आधार जोडणी योजना तयार करण्यात आली आहे. हे देखील वाचा- नवीन वर्षापासून लागू होणार 'हे' 8 नवे नियम; जाणून घ्या काय होणार परिणाम

प्राप्तिकर विभागाचे ट्वीट-

सीबीडीटी नियमांनुसार आयकर भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे करण्यात आले आहे. बनावट पॅनकार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅनकार्डला आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif