Pakistani Army Attack: पाकिस्तान लष्कर आणि पोलीस यांच्यात संघर्ष, पंजाब प्रांतातील चौकीवर हल्ला

पंजाब प्रांतातील बहावलनगर जिल्ह्यात पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांनी पंजाबच्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे.

Pakistan Army Attack PC TWITTER

Pakistani Army Attack:  पाकिस्तानी लष्कर नेहमीच चर्चेत येत असतात. नुकताच या देशातील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान लष्करातील काही जवान आपल्याच देशातील पोलिसांना बेदम मारहाण करत आहे. ही घटना पंजाब प्रांतातील बहावलनगर जिल्ह्यात घडली आहे. पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांनी पंजाबच्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांमध्ये आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमक झाली आहे. (हेही वाचा- बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि बॉम्बरला बंगालमधून अटक

व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रमाणे, पाकिस्तानी लष्कराने पंजाब प्रांतातील पोलिसांच्या पोलिस स्टेशनवर हल्ला केल्याचा दावा आहे. लष्कराने बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांची चूक होती असं सांगण्यात आले आहे. लष्करातील जवानाकडून अवैध्य शस्त्रे जप्त करण्याचा धाडस पोलिसांनी दाखवले. यानंतर पोलिस ठाण्यावर रागाच्या भरात हल्ला केला आणि जो कोणी मिळेल त्याला पळवून पळवून मारहाण केली.

या घटनेनंतर पाकिस्तानी पत्रकार रौफ लसराने X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो लगेच व्हायरल देखील झाला आहे. त्याने पोस्टवर लिहले आहे की, पंजाबमधील भवालनगर येथील मदारिसा पोलिस स्टेशन आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशात एक खळबळ उडाली आहे. परिस्थिती बरीच बिघडली आहे. आता या प्रकरणी लष्करप्रमुख काय बोलतात हे पाहावे लागेल.या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif