Wrestlers Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी व्यक्त केल्या वेदना; म्हणाले, 22 दिवस झाले, तरी सरकारकडून बोलायला अजूनही कोणी आले नाही
कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 22 दिवस झाले आहेत, परंतु सरकारकडून किंवा भाजपची कोणतीही व्यक्ती त्यांच्याशी बोलायला आलेली नाही.
Wrestlers Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest) सुरूच आहे. या धरणे आंदोलनाला आज 22 दिवस झाले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना अटक होईपर्यंत संप मिटवणार नाही, या मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 22 दिवस झाले आहेत, परंतु सरकारकडून किंवा भाजपची कोणतीही व्यक्ती त्यांच्याशी बोलायला आलेली नाही.
सोमवारी आम्ही भाजपच्या सर्व महिला खासदारांना पत्र लिहून त्यांची मदत घेणार असल्याचे पैलवानांनी सांगितले. आमच्यावर झालेल्या या अत्याचाराविरोधात आम्ही सर्व जनतेला आवाज उठवण्याचे आवाहन करतो. आम्हाला समाजातील सर्व लोकांचा पाठिंबा हवा आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक म्हणाली की, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावरील सर्व आरोप खरे आहेत. म्हणूनच ब्रिजभूषणला शिक्षा होण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. (हेही वाचा - BrahMos Supersonic Missile: INS मुरगाववरून फायर केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राने साधला निशाणा)
मंगळवारी सर्वांनी आपापल्या जिल्हा मुख्यालयात जाऊन निवेदन द्यावे, असे आवाहन विनेश फोगट यांनी केले. 16 मे रोजी आमच्या समर्थनार्थ सत्याग्रह करा. ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघ विसर्जित केल्याचे आम्ही स्वागत करतो, असेही यीवेळी पैलवानांनी सांगितले.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) सरचिटणीसांना सर्व अधिकृत कागदपत्रे त्यांच्या तदर्थ समितीकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. डब्ल्यूएफआयने सांगितले की आयओएच्या आदेशांचे पालन करण्यात कोणतीही अडचण नाही कारण ते आधीच अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणुकीनंतर प्रशासकीय अधिकार डब्ल्यूएफआयकडे जातील. नवनिर्वाचित अधिकारी हे महासंघ चालवतील. IOA ने WFI चे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी आणि राष्ट्रीय फेडरेशनच्या निवडणुका घेण्यासाठी तदर्थ समिती नेमली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार ही तदर्थ समिती नेमण्यात आली आहे. देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप केला आहे आणि त्यांच्या अटकेसाठी 14 मे पासून जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे.