कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रसार माध्यमांना आवाहन; सामान्य जनतेला सोशल डिस्टंसिंगचे महत्व पटवून देण्याची केली विनंती
भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 8 वर पोहचली आहे. तर, 400 हून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षित राहावे, यासाठी प्रशासनाकडून महत्वाची भुमिका बजावली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रसार माध्यमांना (Media House) आवाहन करत सामान्य जनतेमध्ये सोशल डिस्टंसिंगचे (Social Distancing) जनजागृती करण्याची विनंती केली आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 8 वर पोहचली आहे. तर, 400 हून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षित राहावे, यासाठी प्रशासनाकडून महत्वाची भुमिका बजावली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रसार माध्यमांना (Media House) आवाहन करत सामान्य जनतेमध्ये सोशल डिस्टंसिंगचे (Social Distancing) जनजागृती करण्याची विनंती केली आहे. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. दरम्यान, जनतेने टाळ्या वाजवून आणि घंटा नाद करुन करोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या योद्ध्यांनाही सलाम केला. तसेच डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी जनतेने टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले होते.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने इटलीसह इराणमध्येही थैमान सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतातही कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रसार माध्यमांना आवाहन करत सामन्य जनतेमध्ये जनजागृती करण्याची विनंती केली आहे. मी जनतेला घरी थांबण्याचे आवाहन करत असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळ, सार्वजनिक अथवा खाजगी भागातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय
ट्वीट-
कोरोना व्हायरसने 180 हून देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागले. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश झुंज देत आहेत. तसेच कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.