Surat: बायकोची इच्छा पूर्ण करणे पतीला भलतेच महागात पडले; बहिणीच्या नवऱ्याला पाहिल्यानंतर महिलेने केली होती 'अशी' मागणी

बायकोला ऐशोआरामात जगता यावे, म्हणून एका हिरे कारागिराने चक्क मोटारसायकल चोरी करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Image For Representation (Photo Credit: Pixabay)

बायकोची इच्छ पूर्ण करणे एका व्यक्तीला भलतेच महागात पडले आहे. बायकोला ऐशोआरामात जगता यावे, म्हणून एका हिरे कारागिराने चक्क मोटारसायकल चोरी करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुरतमधून (Surat) उघडकीस आली आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार तुटल्याने आणि बायकोकडून वारंवार टोमणे ऐकायला लागत असल्यामुळे आरोपीने चक्क चोरीचा मार्ग निवडला, अशी महिती समोर आली आहे. त्यानुसार तो शॉपिंग कॉम्पेक्समध्ये येणाऱ्या बाईकची चोरी करू लागला. लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बलवंत चौहान असे आरोपीचे नाव आहे. बलवंत हा हिरे कारागिर असून त्याला पंधरा ते वीस हजार रुपये पगार मिळायचा. परंतु, लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार तुटल्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासायला लागली. बलवंतची पत्नी आपल्या मोठ्या बहिणीच्या ऐशोआरामाच्या लाईफस्टाईला भुलून पतीला जास्त पैसे कमाव असा तगादा लावायची. परंतु, बलवंतचा साडू बिल्डर असल्यामुळे त्याच्याकडे अधिक पैसा आहे. दरम्यान, आपल्या बायकोचे वारंवार टोमणे ऐकायला लागत असल्यामुळे बलंवतने बाईक चोरी करण्यास सुरुवात केली. परंतु, बलवंत हा काही दिवसानंतर सुरत पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकला आणि त्याला अटक झाली. तसेच त्याने चोरी केलेल्या सर्व बाईक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. हे देखील वाचा- Raipur Murder: दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले; एकाने सिने स्टाईलने केली दुसऱ्याची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉपिंग कॉम्पेक्स आणि हिरे व्यापाऱ्यांकडे कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवून असायचा. त्यांच्या कामाला येण्या-जाण्याच्या वेळा माहिती असल्यामुळे त्याला पार्किंग लॉटमधून बाईक चोरणे सोपे जात होते. बलवंत हा दुपारच्या वेळी बाईक चोरी करायचा. त्याने आतापर्यंत कापोदरा, वरचा, अमरोली, कातरगाम या भागांत बलवंतने किमान 30 बाईक चोरल्याची माहिती समोर आली आहे.