Coronavirus: ओला चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश आगरवाल पुढील वर्षभराचे संपूर्ण वेतन Ola वाहनचालकांना देणार

याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, या काळात देशातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश आगरवाल यांनी आपला वर्षभराचा पगार ओलाच्या वाहनचालकांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhavish Aggarwal (PC - PTI)

Coronavirus: सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, या काळात देशातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

याच पार्श्वभूमीवर ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश आगरवाल (Ola Chief Executive Officer Bhavish Aggarwal) यांनी आपला वर्षभराचा पगार ओलाच्या वाहनचालकांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या अनेक ओला कर्मचारी घरात बसून आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही. त्यामुळे भाविश आगरवाल यांनी आपले वर्षभराचे वेतन या कर्मचाऱ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. (हेही वाचा - दिल्लीमध्ये आजपासून 1 हजार दुकानात मोफत राशन मिळणार - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल; 28 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

दरम्यान, भाविश आगरवाल यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये सांगितलं आहे की, सध्या हजारो वाहनचालक आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही उत्पन्नाशिवाय जगत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही निधी गोळा करण्यास सुरुवात करीत आहोत. याच निधीसाठी मी माझे पुढील वर्षाचे संपूर्ण वेतन देण्याचे निश्चित केले आहे. ओलाचे सर्व कर्मचारी या निधीसाठी पैसे देणार आहेत. ओला वाहन चालकांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी जमविण्याचे आमचे उद्दिष्ट्य असल्याचंही आगरवाल यांनी म्हटलं आहे.