Covid New Guidelines Rules: आता पर्यटकांना कोरोना चाचणी केल्यानंतरचं पाहता येणार ताजमहल; आरोग्य विभागाने वाढवली दक्षता

आता ताजनगरीत येणाऱ्या सर्व पर्यटकांची तपासणी होणार आहे.

Taj Mahal, Covid Test (PC - Wikimedia Commons/ANI)

Covid New Guidelines Rules: चीनसह जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यानंतर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. याअंतर्गत कोरोना नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, वेगवेगळ्या राज्यांनी कोविडशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत यूपी सरकारने नवीन नियमही जारी केले आहेत. त्याचबरोबर आग्रामध्ये कोरोना संसर्गाबाबत आरोग्य विभागाकडून दक्षता वाढवण्यात आली आहे. आता ताजनगरीत येणाऱ्या सर्व पर्यटकांची तपासणी होणार आहे. खेरिया विमानतळासह आग्रा कॅंट आणि फोर्ट रेल्वे स्थानकावर आरोग्य विभागाकडून चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. राज्यात चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

आग्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, सध्या एसएन मेडिकल आणि जिल्हा रुग्णालय, ताजनगरीची प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त, बाहेर चार ठिकाणी कोविडची चाचणी केली जात आहे. दोन रेल्वे स्थानके आणि विमानतळाव्यतिरिक्त, आंतरराज्यीय बस स्टँड (ISBT) परिवहन नगर येथे देखील चाचण्या घेतल्या जात आहे. (हेही वाचा - Covid Booster Dose: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे 10 पैकी 6 भारतीय कोविड बूस्टर डोस घेण्यास नाखूष आहेत; सर्वेक्षणात खुलासा)

डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोना विषाणूबाबत शासन स्तरावरूनही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, त्यांचेही पालन केले जाईल. त्यांनी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. मास्क आणि सामाजिक अंतर पाळल्यासच कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो. यासोबतच हँड सॅनिटायझेशनसाठीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये दररोज सुमारे 1000 चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, आता पुन्हा चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.

दरम्यान, 25 नोव्हेंबर 2022 नंतर आग्रामध्ये एकही नवीन केस आढळली नाही. यापूर्वी 1 ते 25 नोव्हेंबर दरम्यान एकूण 13 कोरोना रुग्ण आढळले होते. पहिल्या लाटेत यूपीमधील पहिला रुग्ण आग्रा येथेच आढळला होता. संक्रमणग्रस्त देशांमध्ये प्रवास करून परत आलेल्या लोकांची तपासणी केली जाईल. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जाईल. चीनमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.