Uttar Pradesh Crime News: अकरावीच्या विद्यार्थीनीवर तरुणाचा क्रुरपणे हल्ला, नोएडा येथील घटना
शहरातील नोएडा येथे एका खाजगी शाळेतील इयत्ता 11 वीच्या मुलीवर एका मुलाने क्रूरपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशात मुलीवर होणाऱ्या अत्याचार या वाढत चालल्या आहे. दरम्यान शहरातील नोएडा येथे एका खाजगी शाळेतील इयत्ता 11 वीच्या मुलीवर एका मुलाने क्रूरपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तीन दिवसांपूर्वी आरोपीविरुद्ध केलेल्या छळाच्या तक्रारीवरून ही घटना शुक्रवारी घडली. मुलीने शाळेच्या अधिकाऱ्यांकडे मुलगा आणि त्याच्या मित्रांकडून छळ आणि गैरवर्तनाची तक्रार केली होती ज्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
तक्रारीमुळे संतप्त झालेल्या मुलाने शुक्रवारी मुलीला बेदम मारहाण केली तीच्यावर हल्ला केला आणि मित्रांनी तिच्यावर क्रूर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि पोलिस दोघांकडे तक्रार दाखल केली. नोएडाच्या सेक्टर -100 मध्ये असलेल्या पाथवे स्कूलच्या अधिकाऱ्यांनी, जिथे ही घटना नोंदवली गेली, त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची अधिक तपासणी सुरु करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. मुलीवर सद्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.