Supreme Court Declined Relief to Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही; अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार
त्याच्या लवकर सुटकेची मागणी करणाऱ्या याचिकेवर आता बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावर बुधवारी सुनावणी होणार असून उच्च न्यायालयाचा आदेश आल्यास ते रेकॉर्डवर घ्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
Supreme Court Declined Relief to Arvind Kejriwal: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Scam Case) तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला नाही. त्याच्या लवकर सुटकेची मागणी करणाऱ्या याचिकेवर आता बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावर बुधवारी सुनावणी होणार असून उच्च न्यायालयाचा आदेश आल्यास ते रेकॉर्डवर घ्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. केजरीवाल यांनी त्यांच्या सुटकेला अंतरिम स्थगिती देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
केजरीवाल यांच्या अर्जात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने प्रस्थापित कायदेशीर प्रक्रिया आणि परंपरेकडे दुर्लक्ष करून जामीन आदेशाला स्थगिती दिली आहे. याबाबत देशात प्रस्थापित न्याय आणि जामीन या मूलभूत तत्त्वांचेही उल्लंघन झाले आहे. राजकीयदृष्ट्या, याचिकेत असेही म्हटले आहे की, ते केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे टीकाकार असल्याने त्यांना ईडीच्या नाराजीचा आणि भेदभावपूर्ण प्रक्रियेला सामोरे जावे लागले. (हेही वाचा - Delhi Court Grants Bail to Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; दिल्ली न्यायालयाकडून दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर)
तथापी, मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ईडी आणि केजरीवाल यांचे वकील आज दिल्ली उच्च न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर केला. केजरीवाल यांच्या सुटकेच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने सध्या स्थगिती दिली आहे.