Zomato Drone ची चाचणी यशस्वी, 10 मिनिटांत पोहोचवले 5 किलो वजनाचे खाद्यपदार्थ
ऑनलाईन ऑर्डरिंग आणि फूड डिलिवरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने बुधवारी आपली हायब्रिड ड्रोन सेवेची (Drone Service) पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीमध्ये केवळ 10 मिनिटांमध्ये पाच किलोमीटर चेअंतर कापून फूड पॅकेटची डिलिव्हरी करण्यात आली
ऑनलाईन ऑर्डरिंग आणि फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने बुधवारी आपली हायब्रिड ड्रोन सेवेची (Drone Service) पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीमध्ये केवळ 10 मिनिटांमध्ये पाच किलोमीटर चेअंतर कापून फूड पॅकेटची डिलिव्हरी करण्यात आली. यात 80 किमी प्रति तासाच्या हिशोबाने ही डिलिव्हरी झाल्याचे सांगण्यात येतय. झोमॅटोच्या या यशस्वी चाचणीनंतर लवकरात लवकर ही ड्रोन सेवा सुरु होईल असे झोमॅटोच्या अधिका-यांकडून सांगण्यात येतय.
झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिन्दर गोयल (Deepinder Goyal) यांनी सांगितले की, ''ह्या हायब्रिड ड्रोन ने 5 किमी चे अंतर केवळ 10 मिनिटांत पुर्ण केले गेले. याची गती 80 किमी प्रति तास इतकी होती. या चाचणीत 5 किलो वजनाचे ऑर्डरची डिलिव्हरी करण्यात आली. येत्या काही दिवसांता दिल्ली आणि मोठ्या उपनगरांमध्ये कंपनी ही सेवा सुरु करेल. या सेवेमुळे वेळेची बचत होऊन कमी वेळात फूड डिलिव्हरी होईल." असेही त्यांनी सांगितले. आपला हा आनंद त्यांनी ट्विटरवर शेअर केला.
Zomato ने 2018 मध्ये लखनऊ बेस्ड स्टार्टअप TechEagle इनोवेशन संपादित केले होते. हे ड्रोन टेक्नोलॉजीवर कामर करणारी स्टार्टअप असेल. त्यानंतर भारतात ड्रोन बेस्ड फूड डिलिव्हरी करण्याची शक्यता वाढली होती.
Zomato लवकरच ड्रोनद्वारे करणार डिलिव्हरी; TechEagle कंपनीची खरेदी
कंपनी हायब्रिड मल्टी-रोटोर ड्रोन्स चे सुद्धा एक हब टू हब डिलिव्हरी नेटवर्क बनवत आहे. यामुळे आता लवकरच ग्राहकांच्या घराघरांमध्ये जाऊन डिलिव्हरी करेल हे सांगण्यात येतय.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)