Zomato आपल्या कर्मचा-यांना देणार 26 आठवड्याची Paternity Leave, नेटक-यांनी केले या निर्णयाचे स्वागत
पिता होणा-या आपल्या कर्मचा-यांसाठी Zomato ने 26 आठवड्यांची फुलपगारी रजा देण्याचे ठरवले आहेत.
आई होणे हा जितका स्त्री साठी आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, तसेच पुरुषांसाठी वडील होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आयुष्यात येणा-या नव्या पाहुण्याचे स्वागत जितके आईला करायचे तितकेच एक कर्तव्यदक्ष पिता म्हणून पुरुषांना ही करायची असते. पण अनेकदा नोकरदार पित्यांना आपल्या बाळासोबत ते क्षण घालवता येत नाही. म्हणूनच ऑनलाईन फूड ऑर्डर करणारी शॉपिंग साइट Zomato ने आपल्या कर्मचा-यांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. पिता होणा-या आपल्या कर्मचा-यांसाठी Zomato ने 26 आठवड्यांची फुलपगारी रजा देण्याचे ठरवले आहेत. Zomato च्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विशेषकरुन नेटक-यांनी या निर्णयासाठी Zomato चे विशेष कौतुक केले आहे.
Zomato चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, कुटूंबाच्या देखभालीसाठी आणि येणा-या बाळासाठी कंपनी प्रत्येक बाळामागे 1000 डॉलर (जवळपास 69,000 रुपये) इतकी रक्कम देणार असल्याचे सांगितले आहे.
Maternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार!
तसेच गोयल पुढेही असेही म्हणाले की, नवीन बाळाचे स्वागत करण्यासाठी माता आणि पित्यांच्या सुट्ट्यांमध्ये तफावत असणे, हे पटण्यासारखे नाही. म्हणूनच आम्ही आमच्या 13 देशांतील शाखांमध्ये महिला कर्मचा-यांना देण्यात येणा-या Maternity Leave इतकी पुरुष कर्मचा-यांना Paternity Leave देणार आहे. इतकच नव्हे तर ही योजना सरोगसी, दत्तक घेणा-या आणि समलिंगी असलेल्या पालकांनाही लागू करण्यात आलीय.