YouTube Couple Found Dead: केरळमधील यूट्यूब जोडप्याचा मृतदेह आढळला; आत्महत्या केल्याचा संशय
परसाला येथे मृतावस्थेत आढळलेल्या एका यूट्यूब जोडप्याच्या संशयास्पद आत्महत्येचा केरळ पोलीस तपास करत आहेत. 'सेल्लू फॅमिली' या त्यांच्या वाहिनीसाठी ओळखले जाणारे हे जोडपे 1,400 व्हिडिओंचे डिजिटल सामग्री मागे सोडून गेले आहे.
केरळमधील 'सेल्लू फॅमिली' (Sellu Family) या लोकप्रिय युट्यूब वाहिनीसाठी ओळखले जाणारे जोडपे (YouTube Couple) रविवारी केरळमधील परसाला येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले आहे. या जोडप्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. मात्र, अधिक तपासातच ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत अधिकृत पुष्टी होऊ शकेल, असे पोलिसांनी म्हटले आहे. नेहमी आजूबाजूला वावरणारे जोडपे अचानक गायब झाले. त्यांचा वावर उल्लेखनियरित्या कमी झाल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. (Sellu Family YouTube Couple)
पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय
पोलिसांन प्राप्त माहितीवरुन घटनास्थळी हजेरी लावली असता जोडप्याचे आतून बंद असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जोडप्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पारासला पोलिसांनी घरात प्रवेश केल्यावर सेल्वराज (45) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याची पत्नी प्रिया (40) अंथरुणावर पडलेली होती. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे. जोडप्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा.
'सेल्लू फॅमिली' नावाचे एक यूट्यूब चॅनेल
हे जोडपे 'सेल्लू फॅमिली' नावाचे एक यूट्यूब चॅनेल चालवत असे. ज्याचे सुमारे 18,000 फॉलोअर्स होते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील पैलू दर्शविणारे 1,400 हून अधिक व्हिडिओ शेअर केले होते. त्यांचा शेवटचा व्हिडिओ-55 सेकंदाचा छायाचित्र संकलन-शुक्रवारी रात्री पोस्ट करण्यात आला, ज्यामुळे या घटनेला एक भावनीक जोड मिळाली.
तपास आणि सार्वजनिक हेल्पलाईन
तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्याला मानसिक आरोग्याच्या मदतीची आवश्यकता असल्यास, कृपया या हेल्पलाईनवर संपर्क कराः
वंड्रेवाला फाऊंडेशन फॉर मेंटल हेल्थः 9999666555 किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall: 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
समर्थन उपलब्ध आहे आणि पोहोचण्याने फरक पडू शकतो.
आत्महत्या करणारी व्यक्ती जगण्याची उमेद हरवून बसते. अनेकदा या व्यक्ती नैराश्येत जाऊन अशा कृती करतात. आत्महत्या करण्यासाठ प्रदीर्घ काळातील नैराश्य अथवा तत्काली नकारणही पुरेसे ठरु शकते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना भावनिक प्रतिसाद आणि विश्वासात घेऊन पाठिंबा दिला तर हे लोक आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त होऊ शकतात. त्यामुळे मानसिक आजारांचे अभ्यासक आणि समाजातील घटनांचे विश्लेषक सांगतात की, आत्मबळ गमावलेल्या व्यक्तींना कधीही एकटे सोडू नये. सतत त्यांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)