2019 मध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान लग्नांवर बंदी; योगी सरकारचा आदेश
2019 च्या जानेवारी ते मार्च या दरम्यान होणाऱ्या लग्नांवर योगी सरकारने बंदी घातली आहे.
2019 च्या जानेवारी ते मार्च या दरम्यान होणाऱ्या लग्नांवर योगी सरकारने बंदी घातली आहे. या महिन्यात कुंभ मेळ्याचे (Kumbh Mela) आयोजन करण्यात येणार असल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्चमध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या लग्नांवर बंदी घालण्यात आली असून जानेवारी ते मार्च 2019 दरम्यान लग्नाचा मुहूर्त असल्यास तो बदलावा लागणार आहे. त्याचबरोबर या दरम्यान गंगा नदीची स्वच्छता राखणे आणि चर्म उद्योग बंद ठेवण्याचे आदेश देखील योगी सरकारकडून देण्यात आले आहेत.
जानेवारी ते मार्च महिन्यात प्रयागराज येथे लग्नासाठी हॉल किंवा इतर बुकींग केले असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारने सांगितले आहे. कुंभमेळ्यात पवित्र स्नानाच्या एकदिवस आधी आणि एक दिवस नंतर लग्न सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली असल्याचे आदेश योगी सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. यासंबंधित लेखी सूचना हॉटेलमालक आणि लग्नासाठी हॉल देणाऱ्या मालकांना देण्यात आली आहे.
2019 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात पाच पवित्र स्नान होणार आहेत. पहिले स्नान मकर संक्रांतीला तर दुसरे पौष पौर्णिमेला होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मौनी आमावस्या, वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमेला पवित्र स्नान होईल. तर मार्च महिन्यात महाशिवरात्रीच्या एकादशीला पवित्र स्नान होणार आहे.