Yes Bank Crisis: येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, ED ने राणा कपूर व वाधवान बंधूंची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त

येस बँक (Yes Bank) कर्ज घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी बँक प्रमुख राणा कपूर (Rana Kapoor) आणि डीएचएफएलचे (DHFL) प्रवर्तक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता अॅटॅच केली आहे.

बातम्या Prashant Joshi|
Yes Bank Crisis: येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, ED ने राणा कपूर व वाधवान बंधूंची 2,203 कोटी रुपयांची माल Video: हत्तीला पाहून शिकारी वाघाची अवस्था बिघडली, हत्तीला पाहून लपला झुडपात (पाहा व्हायरल व्हिडिओ)</a></li> 
                                                                                        <li><a href=OMG: चमत्कार! असा अपघात तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल, भरधाव ट्रकखाली बाईक घसरली, तरुणाने मृत्यूला दिला चकवा
Close
Search

Yes Bank Crisis: येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, ED ने राणा कपूर व वाधवान बंधूंची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त

येस बँक (Yes Bank) कर्ज घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी बँक प्रमुख राणा कपूर (Rana Kapoor) आणि डीएचएफएलचे (DHFL) प्रवर्तक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता अॅटॅच केली आहे.

बातम्या Prashant Joshi|
Yes Bank Crisis: येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, ED ने राणा कपूर व वाधवान बंधूंची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त
YesBank founder Rana Kapoor (PC - Twitter)

येस बँक (Yes Bank) कर्ज घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी बँक प्रमुख राणा कपूर (Rana Kapoor) आणि डीएचएफएलचे (DHFL) प्रवर्तक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता अॅटॅच केली आहे. यामध्ये राणा कपूरची 1000 कोटी आणि वाधवान बंधूंच्या 1200 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. ही कारवाई मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (Anti-Money Laundering Law) झाली आहे. यामध्ये, दिल्लीचा पॉश एरिया अमृता शेरगिल मार्गावर असलेला राणा कपूरचा बंगला, याव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील पेडर रोड, लंडन आणि न्यूयॉर्कमधील अनेक मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. वाधवान बंधूंच्या संलग्न मालमत्तांमध्ये 12 अपार्टमेंट, पुण्यातील जमीन, लंडन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्कमधील मालमत्तांचा समावेश आहे.

येस बँक प्रकरणात, दीवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) च्या भूमिकेचा तपास ईडीकडून केला जात आहे. यात 3700 कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. येस बँकेकडून कर्ज घेण्यासाठी डीएचएफएलने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या कुटुंबांच्या कंपन्यांना 600 कोटींची लाच दिल्याचे तपास यंत्रणांचा आरोप आहे. सीबीआय एफआयआरनुसार, घोटाळा एप्रिल ते जून 2018 दरम्यान सुरू झाला, जेव्हा येस बँकेने डीएचएफएलच्या अल्प-मुदतीच्या डीबेंचरमध्ये 3,700 कोटींची गुंतवणूक केली. (हेही वाचा: राणा कपूर यांना मुंबई स्पेशल कोर्टाकडून दिलासा, अटकेपूर्वी येत्या 11 जुलै पर्यंत अंतरिम प्रोटेक्शन मिळणार)

ईडीने येस बँक प्रकरणात डीएचएफएलचे प्रवर्तक धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना चौकशीसाठी बोलावले होते, पण दोघांनीही देशातील कोरोना विषाणू परिस्थितीचे कारण सांगून येण्यास नकार दिला. दरम्यान, ईडीनुसार कपूर यांच्या कार्यकाळात येस बँकेने दिलेली सुमारे 30,000 कोटी रुपयांची कर्जे बुडित कर्ज ठरली. त्यापैकी 20,000 कोटी रुपयांची कर्जे एनपीए झाली. अशोक कपूर यांच्यासह राणा कपूर यांनी 2004 मध्ये येस बँकची स्थापना केली. जानेवारी 2019 पर्यंत ते बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change