Yasin Malik Life imprisonment: यासीन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा, टेरर फंडीग प्रकरणात दिल्ली कोर्टाचा निर्णय
यासीन मलिक (Yasin Malik) याला दोषी ठरवल्यानंतर न्यायालय काय शिक्षा देते याकडे लक्ष लागले होते.
दिल्ली येथील पटियाला कोर्टाने (Patiala House Court ) टेरर फंडींग प्रकरणात (Terror Funding Case) यासीन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा (Yasin Malik Life imprisonment) ठोठावण्यात आली आहे. यासीन मलिक (Yasin Malik) याला दोषी ठरवल्यानंतर न्यायालय काय शिक्षा देते याकडे लक्ष लागले होते. एनआयएने कोर्टाकडे मलिक याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यासीन मलिक याच्या बाजूने बचाव पक्षाने जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे जन्मठेप की फाशी याबाबत देशभरातून उत्सुकता होती.
कोर्टात सुनावणीवेळी यासीन मलिक यांनी म्हटले की, बुऱ्हान वाणी याच्या एन्काऊंटर नंतर अवघ्या 30 मिनीटांमध्ये मला अटक करण्यात आली होती. पीए अटल बिहारी वाजपेयी यांनी मला पासपोर्ट दिला होता. मला भारताबद्दल व्याख्यान देण्याची अनुमती दिली होती. कारण मी दोषी नव्हतो. भारतातील जवळपास 7 पंतप्रधानांसोबत मी काम केले आहे. या प्रकरणा आगोदर माझ्या विरोधात कोणताही खटला सुरु नव्हता. (हेही वाचा, Terror Funding Case मध्ये फूटीरतावादी Yasin Malik दोषी; NIA कोर्ट 25 मेला करणार शिक्षेची सुनावणी)
दरम्यान, यासिन मलिक याच्या विरोधात मात्र एनआयएने कलम 121 अन्वये अधिकाधिक शिक्षेची मागणी केली होती. 121 कलमान्वये दिली जाणारी सर्वात कमीत कमी शिक्षा ही जन्मठेप आहे. मलिक याने असेही म्हटले होते की, 1994 मध्ये मी शस्त्र सोडल्यानंतर महात्मा गांधी यांच्या विचारांचे पालन केले. तेव्हापासून मी कश्मीरमध्ये अहिंसक राजकारण सुरु केले. कोर्टरुममध्ये यासीनने म्हटले की, 28 वर्षे जर मी काही दहशतवादी कृत्य, अथवा हिंसक प्रकरणात सहभागी असेल इंडियन इंटेलिजेन्स जर तसे सांगत असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. फाशीही स्वीकारायला तयार आहे.
ट्विट
यासिन मलिक याच्यावर यूएपीए अंतर्गत खटाल सुरु होता. ज्यात कलम 16 (दहशतवादी कारवाया), कलम 17 दहशतवादी कारवायांसाठी निधी जमविणे, कलम 18 (दहशतवादी कृत्याचा कट रचणे), कलम 20 (दरशतवादी संघटनांचा सदस्य होणे), भारतीय दंड संहिता कलम 120-ब (गुन्हेगारी कट), कलम 124- अ (देशद्रोह), सन 2017 मध्ये हिंसाचाराशी संबंधीत प्रकरणात दहशतवादी बुऱ्हान वाणी हा चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर 2016/17 मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना वाढल्या होत्या. त्यानंतर तपास यंत्रणा आयएनएने यासीन मलिक आणि इतर फुटीरतावाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती.