WWE रेसलर The Great Khali उर्फ दलिपसिंग राणा याचा भाजपमध्ये प्रवेश, राजकारणातून सुरु करणार नवी इनिंग
पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गळाला एक बहुचर्चीत मासा गळाला लागला आहे. WWE रेसलर The Great Khali उर्फ दलिपसिंग राणा (Dalip Singh Rana) याने आज भाजप प्रवेश ( The Great Khali Joins BJP) केला. दिल्ली येथील भाजप कार्यालयात 'द ग्रेट खली' याचा पक्षप्रवेश पार पडला.
पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गळाला एक बहुचर्चीत मासा गळाला लागला आहे. WWE रेसलर The Great Khali उर्फ दलिपसिंग राणा (Dalip Singh Rana) याने आज भाजप प्रवेश ( The Great Khali Joins BJP) केला. दिल्ली येथील भाजप कार्यालयात 'द ग्रेट खली' याचा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. 'द ग्रेट खली' उर्फ उर्फ दलिपसिंग राणा हा भारतीय व्यावसायिक रेसलर (WWE Wrestler) आहे.
'द ग्रेट खली' हा मुळचा हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. पाठीमागील काही दिवसांपूर्वी त्याने समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली होती. रेसलींगच्या खेळात खलीची नजरेत भरणारी उंची, बलदंड देह आणि तशीच फायटींग या सर्व गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. WWE च्या रिंगमध्ये त्याने केलेली दमदार कामगीरी आजही अनेकांच्या स्मरमात आहे. युट्युबवर त्याचे व्हिडिओ आजही मोठ्या आवडीने पाहणारे लोक आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मोठा चाहता वर्ग असलेल्या खलीचा पक्षप्रवेशानंतर भाजपला कसा फायदा होतो हे येणारा काळच सांगणार आहे. (हेही वाचा, PM Modi Interview: पाच राज्यांमध्ये भाजपच जिंकेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा)
ट्विट
'द ग्रेट खली' राजकारणात येणार याबाबत पाठिमागील काही दिवसांपासूनच चर्चा सुरु होती. दरम्यान, कोणत्या पक्षात प्रवेश करायचा की स्वत:चा नवा पक्ष स्थापन करायचा याबाबत अद्याप निश्चीती नव्हती. दरम्यान, काल खलीने केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खली भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आता त्याने औपचारिकपणे भाजप प्रवेश केला आहे. सिंघु बॉर्डरवर जाणून खलीने गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनात उपस्थिती दर्शवली होती. त्यानंर आता त्याने थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. संमिश्र चर्चाही सुरु आहेत. खली आता भाजपला पंजाबमध्ये भक्कम करण्यासाठी किती फायदेशीर ठरणा हे येणारा काळच सांगणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)