भारतीय शेतीत पिकतोय World's Expensive Mango, किंमत घ्या जाणून
घ्या जाणून.
Worlds Expensive Miyazaki Mango: जगातला सर्वात महाग आंबा कोठे मिळेल? असा सवाल जर तुम्हला कोणी विचारला तर काय उत्तर द्याल? आम्हाला वाटते भारत. आणि भारतात कोठे म्हटले तर? उत्तर आहे ओडिशा. होय, या राज्यातील एका शेतकऱ्याने दावा केला आहे की त्याने त्याच्या आमराईत जगातील सर्वात महागडा आंबा पिकवला आहे. भोई असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, त्याने ओडिशातील कालाहंडी जिल्ह्यातील त्याच्या बागेत जपानचे मियाझाकी आंबे (Japan's Miyazaki Mangoes) असल्याचे सांगितले.
मियाझाकी आंबा: किंमत फक्त 3 लाख रुपये प्रति किलो
शेतकऱ्याने केलेला दावा पाहता आंब्यांची किंमत ऐकूणही अनेकांना धक्का बसू शकतो. होय, हा आंबा म्हणे प्रति किलो 2.05 लाख ते 3.00 लाख रुपये प्रति किलो दराने विकला जातो. त्याला तेवढी मागणीही आहे. आंब्याचा गंध, चव आणि त्याची टीकवणक्षमता ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.
एएनआयने वृत्तात पुढे म्हटले आहे की, भोई नामक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीत आंब्याच्या विविध प्रजातींची लागवड केली आहे. राज्याच्या फलोत्पादन विभागामार्फत बियाणे मिळविल्यानंतर त्यांनी आपल्या बागेत 'मियाझाकी' प्रजातिच्या अंब्यांची लागवड केली.
'तायो नो तामागो' किंवा 'Egg of the Sun'
मियाझाकी ही आंब्याची प्रजाती मूळतः जपानी आहे. त्याच्या विशिष्ट चव आणि औषधी मूल्यासाठी परदेशात याला प्रचंड मागणी आहे. जपानी लोकांच्या मते, जगातील सर्वात महागड्या आंब्याचे मूळ नाव "तायो नो तामागो" किंवा Egg of the Sun आहे. जपानच्या मियाझाकी प्रीफेक्चरमध्ये शेती केली जाते आणि म्हणूनच जग या स्वादिष्ट आंब्यांना "मियाझाकी" म्हणू लागले. या आंब्याबद्दल आणखी सांगायचे तर मियाझाकी आंबा हा जपानच्या मियाझाकी प्रांतात पिकवल्या जाणार्या आंब्याचा अत्यंत मानाचा आणि मागणी असलेला प्रकार आहे. मियाझाकी प्रीफेक्चर, क्युशू बेटावर हा आंबा आढळतो. कारण या आंब्याच्या लागवडीस हातभार लावणारे आदर्श हवामान परिस्थिती आणि सुपीक माती आहे. मियाझाकी आंबे त्यांच्या अपवादात्मक गोडवा, समृद्ध चव आणि गुळगुळीत, रसाळ पोत यासाठी ओळखले जातात. उच्च गुणवत्तेमुळे आणि मर्यादित उपलब्धतेमुळे ते सहसा लक्झरी फळ मानले जातात. मियाझाकीमधील शेतकरी आंब्याच्या झाडांची लागवड आणि संगोपन करताना खूप काळजी घेतात, परिणामी रंग आणि उल्लेखनीय चव असलेली उच्च-गुणवत्तेची फळे मिळतात.
हे आंबे विशेषत: एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत काढले जातात, पिकाचा हंगाम जून आणि जुलैमध्ये असतो. ते सहसा आलिशान भेटवस्तू म्हणून सादर केले जातात आणि जपानमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना बक्षीस दिले जाते.