Woman Kills Daughter Over Superstition: झारखंडमध्ये अंधश्रद्धेपोटी आईने केली पोटच्या मुलीची हत्या; काळीज चिरून खाल्ले, पोलिसांकडून अटक
ही महिला आपल्या मुलीला घरापासून दूर सिकनी बारवधोडा जंगलाजवळच्या निर्जन ठिकाणी घेऊन गेली. या ठिकाणी तिने मंत्रोच्चार सुरु केला. त्यानंतर तिने मुलीला विवस्त्र केले, त्यानंतर स्वतःही नग्न होऊन बांगड्या, कपडे व इतर साहित्य घेऊन पूजा सुरु केली.
झारखंडमधील (Jharkhand) पलामू येथून एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हुसैनाबाद जिल्ह्यात एका महिलेने अंधश्रद्धेपोटी (Superstition) स्वत:च्या मुलीचा बळी दिला आहे. महिला एवढ्यावरच थांबली नाही, तिने आधी काळ्या जादूच्या नावाखाली आपल्या मुलीची हत्या के, त्यानंतर तिने मुलीचे काळीज चाकूने बाहेर काढले आणि ते खाल्ले. परी असे मृत मुलीचे नाव असून ती हुसेनाबाद येथील रहिवासी आहे. ही घटना खराड गावातील असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत हुसैनाबाद पोलिसांनी आरोपी महिला गीता देवी हिला अटक केली आहे.
घरापासून दोन किलोमीटर अंतरावर गीता देवी हिने आपल्या मुलीचे हत्या केली. ही महिला आपल्या मुलीला घरापासून दूर सिकनी बारवधोडा जंगलाजवळच्या निर्जन ठिकाणी घेऊन गेली. या ठिकाणी तिने मंत्रोच्चार सुरु केला. त्यानंतर तिने मुलीला विवस्त्र केले, त्यानंतर स्वतःही नग्न होऊन बांगड्या, कपडे व इतर साहित्य घेऊन पूजा सुरु केली. पूजा केल्यानंतर आरोपी महिलेने तेथे काही वेळ नृत्य केले. यानंतर त्याने चाकूने मुलीचा गळा कापून तिचा बळी दिला.
यावेळी महिलेने मुलीच्या शरीराचे तुकडे केले. मग तिचे काळीज काढून खाल्ले. यानंतर महिलेने मुलीचा मृतदेह मातीत पुरला आणि स्वत: नग्न अवस्थेत घरी परतली. आरोपी गीता देवी हिला त्या अवस्थेत पाहून आजूबाजूच्या लोकांनी तिच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा नवरा दिल्लीत काम करतो आणि ती तिची सासू कौशल्या देवीसोबत राहते. महिलेच्या सासू-सासऱ्यांनी गीताला त्या अवस्थेत पाहिल्यावर ते अवाक झाले. कौशल्याने गीताला मुलीबद्दल विचारले असता तिने परीची हत्या केल्याची कबुली दिली. (हेही वाचा: Navratri 2024: नवरात्रीत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा! देवीची पूजा करताना तरुणीने तलवारीने कापली आपली जीभ; Madhya Pradesh मधील धक्कादायक घटना)
यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गावात जाऊन महिलेला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळावरून नग्न मुलीच्या शरीराचे तुकडे, तुटलेल्या बांगड्या आणि कपडे जप्त केले. याप्रकरणी पोलीस स्टेशन प्रभारी संजय कुमार यादव यांनी सांगितले की, आरोपी महिलेने अंधश्रद्धेमुळे हे कृत्य केले. तसेच, पोलिसांनी चौकशी केली असता, गीताने ती काळी जादू शिकत असल्याचे सांगितले. या वेळी तिला स्वप्न पडत होते की मंत्र सिद्धीसाठी तिला आपल्या पती किंवा मुलीचा त्याग करावा लागेल. यासाठी त्याने आपल्या निष्पाप मुलीचा बळी दिला.