Bhiwandi Crime: भिवंडीत बंद घरात आढळला महिलेचा मृत्यू; दुर्गंधी पसरल्याने समोर आली घटना
घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह ,गुन्हे शाखा पथक,फॉरेन्सिक पथक व पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील एका खोलीत 36 वर्षीय महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भिवंडी पोलिसांनी या घटनेची माहिती मंगळवारी दिली. या हत्येत तिचा लिव्ह-इन पार्टनर आणि महिला मैत्रिणीची भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघांचाही पत्ता लागलेला नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, किमान तीन-चार दिवसांपूर्वी महिलेचा गळा चिरून खून झाला असावा. मृताची ओळख पटली आहे. (हेही वाचा - Sailor Dies Due To Snake Bite: पालघरमधील माहीम येथील खलाशाचा सर्पदंशाने मृत्यू; गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना)
पोलिसांना सोमवारी रात्री कोनगाव परिसरात असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्याच्या मालकाने दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले. "पोलिसांनी दरवाजा तोडला आणि ती महिला स्वयंपाकघरात मृतावस्थेत आढळून आली," तो पुढे म्हणाला. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला घटस्फोटित असून ती गेल्या 11 महिन्यांपासून खोलीत राहिली होती, अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या हत्येचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह ,गुन्हे शाखा पथक,फॉरेन्सिक पथक व पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास कोनगाव पोलीस करीत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेपर कटर जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.