Mumbai Doctor Assaulted: सायन रुग्णालयात मद्यधुंद टोळक्यांकडून महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ; हल्ल्यात डॉक्टर जखमी

कोलकातामधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानात मुंबईतही एका महिला डॉक्टरला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सायन रुग्णालयात मद्यधुंद पेशंटकडून महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ करण्यात आली.

Representational Image (Photo Credits: File Image)

Mumbai Lady Doctor Attack: कोलकातामधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानात मुंबईतही एका महिला डॉक्टरला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सायन रुग्णालयात मद्यधुंद पेशंटकडून(Drunk Patient) महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ (Doctor Assaulted)करण्यात आली. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाली आहे. सायन पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केला आहे.

कोलकातामधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यामुळे देशात संतपाची लाट आहे. देशभरातली डॉक्टरांनी याचा निषेध नोदंवला आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसत आहेत. मुंबई, ठाण, पुणे आणि नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी संप पुकारण्यात आला होता. देशभरात सध्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. असे असतानाच मुंबईतील सायन येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे डॉक्टर वर्गत आणखी संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी रुग्णालयातच मारहाण केली. त्या तरुणांनी दारु प्यायलेली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. महिला डॉक्टर ड्युटीवर असताना हा प्रकार घडलाय.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला जखम झालेली होती. त्या रुग्णावर उपचार करण्यात येत होते. त्याचवेळी एका व्यक्तीकडून महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. इतक्यावरच थांबले नाही, डॉक्टरवर हल्लाही केला. या हल्ल्यापासून वाचताना महिला डॉक्टर जखमी झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement