Coronavirus Vaccine: लस घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांना होऊ शकते COVID19 ची लागण, अदर पुनावाला यांनी सांगितले कारण
याप्रकरणी विविध देशात याचा तपास सुद्धा केला जात आहे.
Coronavirus Vaccine: कोरोनावरील ऑक्सफोर्डची एस्ट्राजेनेका लस घेतल्यानंतर नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गुढळ्या निर्माण होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी विविध देशात याचा तपास सुद्धा केला जात आहे. दरम्यान येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यातील सिरम इंस्ट्यिट्युट कडून सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लसींची निर्मिती केली जात आहे. ज्याचे डोस भारतातील सर्व नागरिकांना दररोज दिले दात आहे. हिच गोष्ट लक्षात घेता कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांनी इंडिया टुडे यांना दिलेल्या मुलाखतीत लसीचे परिणाम आणि त्या संदर्भात उपस्थितीत केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
बहुतांश लोकांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर सुद्धा त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यावर उत्तर देताना पुनावाला यांनी म्हटले की, मी यासाठीच कोविड शील्ड म्हणून संबोधतो. कारण हे एक प्रकारचे शील्ड असून जो आपल्याला आजार होण्यापासून बचाव करतो आणि त्यामुळे तुमच्या मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता फार कमी असते. लस तुम्हाला गंभीर आजारापासून बचाव करत आणि 95 टक्के प्रकरणे किंवा एक डोस जरी लसीचा घेतला तरीही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत नाही. जसे बुलेट प्रुफ जॅकेट असते त्याचप्रमाणे कोरोनावरील लस काम करते. जानेवारी ते आतापर्यंत आम्ही तब्बल 4 कोटी लोकांना कोरोनावरील लसीचा एक डोस दिला आहे.(Delhi: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनदेखील दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह)
तर लसीसंदर्भात लोकांमध्ये चिंता वाढत चालली आहे आणि ते सहाजिकच असून त्या बद्दल विविध बातम्या, गोष्टी समोर येत असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. पण एस्ट्राजेनेका ऑक्सवर्डच्या लसीवर बंदी घालण्याचे म्हटले तरीही जर्मनीसह अन्य देशांनी त्याच्या लसीसाठी पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.