Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल

अखिलेश यादव यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये जैन समुदायाला थेट संबोधित करताना म्हटले आहे की, 'सध्याच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप बनत चालला आहे. आज अल्पसंख्याक जैन समुदायामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्याची जगभरात चर्चा, निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे.'

Akhilesh Yadav | (Photo Credit - Twitter)

Jain Temple Demolition in Mumbai: समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शुक्रवारी मुंबईत अलिकडेच झालेल्या जैन मंदिराच्या पाडकामाबद्दल (Jain Temple Demolition in Mumbai) चिंता व्यक्त केली. तसेच भाजप सरकारवर भारतातील शांतताप्रिय जैन समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप केला. मुंबईत जैन मंदिर पाडण्यात आल्याच्या माध्यमांच्या वृत्तांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अखिलेश यादव यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये जैन समुदायाला थेट संबोधित करताना म्हटले आहे की, 'सध्याच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप बनत चालला आहे. आज अल्पसंख्याक जैन समुदायामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्याची जगभरात चर्चा, निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे.'

घटनांच्या मालिकेवर प्रकाश टाकताना यादव यांनी दावा केला की, हे समुदायाप्रती वाढत्या आक्रमकतेचा एक भाग आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील सिंगोली येथे जैन साधूंवर झालेल्या हिंसक हल्ल्याचा, जबलपूरमधून लीक झालेल्या एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला ज्यामध्ये भाजप सदस्य जैन धर्मियांबद्दल कथितपणे अपमानजनक टिप्पणी करत होते. (हेही वाचा -Akhilesh Yadav on SP MLA Abu Azmi's Suspension: अखिलेश यादव यांच्याकडून सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा निषेध)

भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात?

जिथे जिथे भाजपची सरकारे आहेत तिथे जैन तीर्थक्षेत्रे, मंदिरे, जिनालये, चैत्यालये, सामाजिक सेवा संस्था आणि समाजासोबत अशा घृणास्पद घटना का घडत आहेत? असा सवालाही अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आरोप केला की, 'भाजपचा पाठिंबा असलेला एक मोठा गट जैनांच्या धार्मिक, सार्वजनिक, व्यावसायिक नव्हे तर वैयक्तिक मालमत्तेवरही लक्ष ठेवून आहे आणि जैनांना अल्पसंख्याक मानून त्यांच्याकडून सर्वस्व हिसकावून घेऊ इच्छित आहे.' (Akhilesh Yadav on Mahakumbh 2025 Stampede: 'महाकुंभचे व्यवस्थापन ताबडतोब सैन्याकडे सोपवावे'; चेंगराचेंगरीच्या घटनेवर योगी आदित्यनाथ सरकारला घेरण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न)

दरम्यान, यावेळी त्यांनी भूतकाळातील घटनांचा उल्लेख केला. त्यांनी गुजरातमधील श्री गिरनार जी वरील वाद, श्री समेद शिखर जी मध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप आणि उत्तर प्रदेशातील बागपत येथे जैन पुतळ्याच्या स्थापनेला झालेल्या विरोधाचा उल्लेख केला. त्यांनी 2022 मध्ये मध्य प्रदेशातील नीमच येथे 65 वर्षीय भवरलाल जैन यांच्या हत्येचाही उल्लेख केला.

अखिलेश यादव यांची एक्स पोस्ट - 

अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की, ही सर्व जैन समुदायाच्या छळाची प्रकरणे आहेत. हे अशा घटना आहेत ज्या उघडकीस आल्या आहेत, नाहीतर कोणास ठाऊक अशा किती घटना आहेत जिथे वर्चस्ववादी शक्ती नेहमीच जैन समुदायाला त्रास देत आल्या आहेत. आज जैन समुदाय भाजपला विचारत आहे की त्यांच्या दृष्टीने आमचे महत्त्व फक्त देणग्या देण्यापुरते मर्यादित आहे का? आमच्या धर्माचे आणि आमचे रक्षण कोण करेल? मंदिराच्या पुनर्बांधणीने मूर्ती, पवित्र ग्रंथ आणि जैन समाज आणि समुदायाचा झालेला अपमान परत मिळवता येईल का? असा सवालही अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement