Akhilesh Yadav on Mahakumbh 2025 Stampede: 'महाकुंभचे व्यवस्थापन ताबडतोब सैन्याकडे सोपवावे'; चेंगराचेंगरीच्या घटनेवर योगी आदित्यनाथ सरकारला घेरण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न
विरोधी पक्षांनी चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी योगी सरकारला जबाबदार धरले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सैन्याकडे महाकुंभाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवावी असे म्हटले आहे.
Akhilesh Yadav on Mahakumbh 2025 Stampede: प्रयागराज येथे महाकुंभ मेळा 2025 दरम्यान मौनी अमावस्येच्या स्नानापूर्वी संगम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांनी चेंगराचेंगरीच्या या घटनेसाठी योगी सरकारला (Yogi Adityanath Govt) जबाबदार धरले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भारतीय सैन्याकडे महाकुंभाच्या (Maha Kumbh Mela 2025) व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवावी असे म्हटले आहे. एवढेच नाही तर सरकार जागतिक दर्जाच्या व्यवस्थेचा दावा करतात त्यांचे दावे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Mahakumbh Stampede-Like Chaos: महाकुंभ मेळा दुर्घटनेवर अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त; पीडितांच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन)
अखिलेश यादव यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'महाकुंभात आलेल्या संत आणि भाविकांमध्ये व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा स्थापित करण्यासाठी, महाकुंभाचे प्रशासन आणि व्यवस्थापन तात्काळ सैन्याकडे सोपवणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाची व्यवस्था स्थापन करण्याच्या दाव्यांमागील सत्य उघड झाले आहे, तेव्हा हे दावे आणि खोटा प्रचार करणाऱ्यांनी या अपघातातील मृतांची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे." आणि त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा असे अखिलेश यादव म्हणाले. (Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'गर्दीत धक्काबुक्की झाली, बाहेर पडायला जागा नव्हती'; प्रत्यक्षदर्शींनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सांगितली भीषणता (Watch Video))
दरम्यान, अखिलेश यादव यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले, महाकुंभातील गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या अपघातात भाविकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात त्वरित वैद्यकीय उपचार द्यावेत. मृतांचे मृतदेह ओळखून ते त्यांच्या नातेवाईकांना सोपवून त्यांच्या निवासस्थानी पाठवण्याची व्यवस्था करावी. हरवलेल्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्वरित प्रयत्न करायला हवेत. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
अखिलेश यादव यांची पोस्ट
View this post on Instagram
दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, "प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकर ठिक होण्याची आशा," असे राहूल गांधी म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

