West Bengal Shocker: स्मार्टफोन विकत घेण्यासाठी चक्क स्वतःचे रक्त विकायला निघाली मुलगी; पोहोचली रुग्णालयात, जाणून घ्या काय घडले पुढे

मुलीने सांगितले की, तिने एका नातेवाईकाच्या फोनवरून स्वत:साठी ऑनलाइन मोबाइल मागवला आहे. त्या मोबाईलसाठी तिला पैशांची गरज आहे व हे पैसे मिळवण्यासाठी ती रक्त विकायला आली होती.

Smartphone apps (Photo Credits: Unsplash)

लोकांच्या स्मार्टफोनबाबतच्या (Smartphone) क्रेझच्या अनेक बातम्या आपण नेहमीच ऐकतो. परंतु पश्चिम बंगालमध्ये (West Bangal) जे घडले आहे ते तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. येथे एक 16 वर्षीय तरुणी आपले रक्त विकण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पोहोचली. तिला रक्त विकून स्वत:साठी स्मार्टफोन घ्यायचा होता. परंतु याची माहिती रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी चाइल्डलाइनला याबाबत माहिती दिली. यानंतर या मुलीचे समुपदेशन करून तिला जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत तिच्या पालकांकडे पाठविण्यात आले.

बालूरघाट जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या समुपदेशकांनी सांगितले की, मुलगी सकाळी दहाच्या सुमारास येथे आली होती. सुरुवातीला त्यांना वाटले की ती रक्त घ्यायला आली आहे, पण तिने जेव्हा तिला रक्त विकायचे आहे सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांना वाटले की तिला तिच्या भावाच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे आहेत, म्हणून तिला रक्त विकायचे आहे. परंतु तिच्याशी काही वेळ बोलल्यानंतर तिने सांगितले की तिला स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे त्यामुळे तिला रक्त विकायचे आहे.

मुलीने सांगितले की, तिने एका नातेवाईकाच्या फोनवरून स्वत:साठी ऑनलाइन मोबाइल मागवला आहे. त्या मोबाईलसाठी तिला पैशांची गरज आहे व हे पैसे मिळवण्यासाठी ती रक्त विकायला आली होती. सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या तपन नावाच्या ठिकाणाहून ही तरुणी बालूरघाटात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात आणि आई गृहिणी आहे. (हेही वाचा: Crime: कुत्र्याने घराबाहेर शौच केल्याने झाला वाद, रागातून महिलेची तरुणाला मारहाण)

मुलगी अल्पवयीन असल्याने रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चाइल्डला 1098 या क्रमांकावर याची माहिती दिली. यानंतर समुपदेशक तेथे पोहोचले आणि मुलीशी बोलले. मुलीने सांगितले की तिने 9000 रुपयांचा फोन ऑर्डर केला आहे. या फोनची डिलिव्हरी गुरुवारी होणार आहे. ही मुलगी सोमवारी ट्युशनला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. तिने तिची सायकल बसस्थानकावर सोडली आणि तेथून बस पकडून बालूरघाट जिल्हा रुग्णालय गाठले. चाइल्डलाइन अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या जिल्हा बाल कल्याण समितीला माहिती दिली. त्यानंतर समितीने मुलीच्या पालकांशी संपर्क साधला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement