Firecracker Factory Explosion: फटाक्यांच्या बेकायदेशीर कारखान्यात स्फोट, नऊ जण ठार (Watch Video)

फटाक्यांच्या बेकायदीश कारखान्यात (Fireworks Factory) झालेल्या स्फोटात नऊ मजूर ठार तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील पूर्व मिदनापूर (East Midnapore) येथे मंगळवारी (16 मे) दुपारी घडली. स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे कारखान्याती कामगारांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या.

Illegal Firecracker Factory | (Photo Credits: Twitte

Firecracker Factory Explosion: फटाक्यांच्या बेकायदीश कारखान्यात (Fireworks Factory) झालेल्या स्फोटात नऊ मजूर ठार तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील पूर्व मिदनापूर (East Midnapore) येथे मंगळवारी (16 मे) दुपारी घडली. स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे कारखान्याती कामगारांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. आजूबाजूच्या काही घरांनाही आग लागली. कारखान्यातील मजुरांचे फाटलेले अवयव उडून ते लगतच्या तलावात विखुरलेल्या अवस्थेत पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. मृतदेह शोधण्यासाठी तलावातील पाणीही उपसण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे.

ओडिशा सीमेपासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या एग्रा जवळील खडीकुल गावात हा स्फोट झाला. तेथे मजूर काम करत असताना गनपावडर आणि स्फोटक रसायनांच्या साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोट झाला तेव्हा किमान १५ मजूर आत काम करत असल्याचा दावा केला जात आहे. (हेही वाचा, Mumbai Fire: वांद्रे परिसरात Nargis Dutt Road वरील झोपडपट्टीला आग; 10 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल)

व्हिडिओ

स्थानिक रहिवाशांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, दुपारी 12 च्या सुमारास त्यांना कानठाळ्या बसवणारा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. पाठोपाठ जवळच (परिसरात) असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यातून धूर निघत असल्याचे दिसले. हा कारखाना कृष्णपाडा बॅग ( Krishnapada Bag) या 61 वर्षीय व्यक्तीच्या मालकीचा आहे. जो तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे समजते. कृष्णपाडा बॅग हा सध्या गायब आहे. तो फरार आहे की, स्फोटात मारला गेला याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत.

ट्विट

पूर्व मिदनापूर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख अमरनाथ के यांनी म्हटले आह की, आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत. आम्ही स्फोटाचे ठिकाण आणि लगतच्या ठिकाणांचा कसून शोध घेत आहोत जेणेकरून इतर बळी पडले असतील तर ते शोधता येतील. स्फोट झालेला कारखाना एका शेतात नालीदार पत्र्यांपासून बनवलेल्या 3,000 चौरस मीटरच्या शेडमध्ये उभारण्यात आला होता. घटनेनंतर पीडितांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी जखमींची प्रकृती गंभीर असल्याचेही अमरनाथ के यांनी सांगितले. दरम्यान, सर्व जखमी सुमारे ९० टक्के भाजल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

फोटो

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्येष्ठ नेते आणि मंत्री मनश भुनिया यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पाठवले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now