पश्चिम बंगाल: मुर्शिदाबाद येथील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान कार्डवर व्यक्तीऐवजी कुत्र्याच्या फोटो
तर मतदाराच्या मतदान कार्डावर व्यक्तीऐवजी कुत्र्याचा फोटो लावण्यात आला आहे. हे प्रकरण मुर्शिदाबाद स्थित रामनगर गावातील आहे.
पश्चिम बंगाल (West Bengal) मधील मुर्शिदाबाद येथील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे सत्य समोर आले आहे. तर मतदाराच्या मतदान कार्डावर (Voter ID) व्यक्तीऐवजी कुत्र्याचा फोटो लावण्यात आला आहे. हे प्रकरण मुर्शिदाबाद स्थित रामनगर गावातील आहे. सुनील कर्माकर असे व्यक्तीचे नाव असून त्यांनी मतदान कार्डवरील त्यांच्याऐवजी कुत्र्याचा फोटो पाहिला असता ते हैराण झाले. याबाबत एएनआय यांनी अधिक माहिती दिली आहे. या प्रकारामुळे सुनील हे अत्यंत नाराज असून त्यांच्यासोबत थट्टा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 64 वर्षीय सुनील कर्माकर यांनी काही दिवसांपूर्वी मतदान कार्ड बनवले होते पण त्यात काही चुका होत्या.
मतदान कार्डवरील चुका दाखवत त्या सुधारण्यासाठी ते पुन्हा पाठवण्यात आले होते. सुनील यांनी असे म्हटले आहे की, मतदान कार्डवरील चुका सुधारण्यासाठी अर्ज सुद्धा केला होता. त्यानंतर मंगळवारी जेव्हा नवे मतदान कार्ड आले त्यावेळी दलाल स्मृती नावाच्या शाळेत बोलावण्यात आले. तेथे गेल्यावर अधिकाऱ्यांनी माझ्या हातात नवे मतदान कार्ड दिल्यावर ते पाहताच मी हैराण झाल्याचे सुनील यांनी म्हटले आहे. मतदान कार्डवर नाव आणि पत्ता योग्य होता. पण फोटोच्या येथे कुत्र्याचा फोटो लावण्यात आला होता. यावरुन शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत स्पष्टपणे दिसून येत आहे.(दशकातील सर्वात मोठा विवाहसोहळा: 500 कोटी खर्च, 1 लाख पाहुणे, 40 एकरचा मंडप; 'असा' असेल BJP मंत्री श्रीरामुलु यांच्या कन्येचा लग्नसमारंभ)
रिपोर्टनुसार, सुनील कर्माकर यांनी कोर्टात धाव घेण्याचा विचार केला आहे. यावर अधिकाऱ्यांनी आम्ही नवे मतदान कार्ड बनवून देतो असे आश्वासन दिले आहे. मात्र देशाचे नागरिकत्व हे मतदान कार्डाने ओळखले जाते. दरम्यान त्यात अधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण प्रिटिंगवेळी एका व्यक्तीऐवजी कुत्र्याचा फोटो कसा लागू शकतो असे ही म्हटले जात आहे.