Watch Video: लग्नाच्या मांडवातून दागिणे आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार (पाहा व्हिडिओ)
अशीच संधी साधून चोरट्यांनी भर मंडपातून (Wedding Ceremony) चक्क दागिणे (Jewelry) आणि रोख रक्कम चोरुन पोबारा केला आहे. प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी लग्नातील वऱ्हाडी म्हणून विवाहस्थळी प्रवेश केला आणि वराच्या वडिलांची बॅग चोरुन नेली.
गर्दी म्हणजे चोरट्यांसाठी एक मोठीच सधी. अशीच संधी साधून चोरट्यांनी भर मंडपातून (Wedding Ceremony) चक्क दागिणे (Jewelry) आणि रोख रक्कम चोरुन पोबारा केला आहे. प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी लग्नातील वऱ्हाडी म्हणून विवाहस्थळी प्रवेश केला आणि वराच्या वडिलांची बॅग चोरुन नेली. ज्यात दागिणे आणि तब्बल चार लाख रुपये होते. ही घटना गाझियाबादमधील एका फार्म हाऊसमध्ये आयोजित झालेल्या विवाह समारंभात घडली. गाझीयाबाद (Ghaziabad) येथील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. विजयनगर सेक्टर-11 मध्ये राहणारे इंद्रेश कुमार त्यागी यांचा बहरामपूर येथील डीके फार्म हाऊसमध्ये विवाह 25 जानेवारी रोजी पार पडला. घटनेबाबत इंद्रेश यांनी सांगितले की, रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान स्टेजवर जाण्यासाठी त्याने शूज काढले. यादरम्यान त्यांनी आपल्या हातातील हँडबॅग स्टेजवर ठेवली. त्याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी बॅगेसहीत पळ काढला. (हेही वाचा, Dadar Shocker: दादर मध्ये गन पॉईंटवर घर लुटलं; एक आरोपी फरार दुसर्याला अटक)
इंद्रेश कुमार यांनी पुढे बोलताना संगितले की, लग्नात आलेले चोरटे हे अत्यंत चांगल्या कपड्यांमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे शक्य झाले नाही. आपण शूज काढण्यासाठी स्टेजवर चढलो इतक्यात एका अज्ञात व्यक्तीने बॅग उचलली आणि चालायला सुरुवात केली. हा अज्ञात व्यक्ती पूर्वीपासून या कार्यक्रमात पाहुणा म्हणून फिरत होता. उत्तम कपड्यांमुळे त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही.
ट्विट
मंचावरून बॅग गायब झाल्याने एकच गोंधळ उडाला. इंद्रेश कुमार म्हणाले, बॅगेत 4 लाख रुपये, चेनची जोडी, अंगठी, पर्स आदी साहित्य ठेवले होते. मंचावरून बॅग गायब झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. बॅग गायब होताच लग्न समारंभात चोरट्याचा शोध घेण्यात आला. पण त्याचा पत्ता लागला नाही. इंद्रेश त्यागी यांनी सोमवारी ठाणे क्रॉसिंग रिपब्लिक येथे चोरीचा एफआयआर दाखल केला. सोबतच पोलिसांना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.