VK Pandian Quits Active Politics: नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन यांची सक्रीय राजकारण सोडण्याची घोषणा; BJD पराभवानंतर मोठा निर्णय
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन (VK Pandian) यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीत (Odisha Assembly Elections) बिजू जनता दलाच्या (BJD) नुकत्याच झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन (VK Pandian) यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीत (Odisha Assembly Elections) बिजू जनता दलाच्या (BJD) नुकत्याच झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. पांडियन यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करत रविवारी (9 जून) म्हटले की, "सक्रिय राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतला आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करा. बीजेडीच्या पराभवात माझ्याविरुद्धच्या झालेल्या पराभवाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती."
बीजेडी पराभवास पांडियन जबाबदार असल्याची भावना
नवीन पटनायक यांच्याशी जवळचे संबंध असलेले पांडियन यांना लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीसाठी बीजेडी नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर दोष दिला. पांडीयन यांनी आपल्या आजवरच्या जीवनप्रवासावर भर देत म्हटले की, "मी अतिशय नम्र कुटुंबातून आणि एका छोट्या गावातून आलो आहे. माझे लहानपणापासूनचे स्वप्न IAS मध्ये सामील होऊन लोकांची सेवा करण्याचे होते. केंद्रपारा येथील माझ्या कुटुंबामुळे मी ते साकार केले. ज्या दिवसापासून मी ओडिशाच्या मातीवर पाऊल ठेवले, त्या दिवसापासून मला ओडिशातील लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. (हेही वाचा, V Sugnana Kumari Deo: सलग 10 वेळा आमदार, 50 वर्षांचा संसदीय राजकारणाचा अनुभव; आमदार व्ही सुगना कुमारी देव यांचे निधन)
पांडियन यांच्याकडून व्हिडिओ प्रसारीत
ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयात 12 वर्षांपूर्वी रुजू झाल्यानंतर, पांडियन यांनी त्यांच्या कार्यकाळाचे "सन्मान" म्हणून वर्णन केले आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. "पटनायक यांच्याकडून मला मिळालेला अनुभव, शिकणे माझ्यासाठी आयुष्यभराचे आहे. ओडिशासाठीचे त्यांचे व्हिजन अंमलात आणण्यासाठी माझ्याकडून त्यांना विशेष अपेक्षा होती. पटनायक यांनीओडीशासाठी आरोग्य, शिक्षण, दारिद्र्य निर्मूलनात अनेक टप्पे यशस्वीपणे पार केले", असेही ते पुढे म्हणाले. (हेही वाचा, Odisha Lok Sabha Election Results: आंध्र प्रदेशनंतर आता ओडिशामध्येही BJP ची मोठी आघाडी; 74 जागांवर पुढे, सत्ता स्थापन करण्याची शक्यता)
भाजपला प्रथमच ओडिशामध्ये सत्ता
ओडिसा राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी पार पडल्या. या वेळी पाठिमागील अनेक वर्षे सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षास दारुन पराभवाचा सामना करावा लागला. या राज्यात भाजपला प्रथमच इतके मोठे यश मिळाले. 178 सदस्यांच्या ओडिशा विधानसभेत भाजपने 78 जागा मिळवत सर्वांनाच चकित केले. लोकसभा निवडणुकीतही भाजपने राज्यातील 21 पैकी 20 जागा जिंकल्या.
नवीन पटनायक यांच्याकडून पांडियन यांचे समर्थन
दरम्यान, बीजेडीच्या पराभवास पटनायक यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडियन यांना पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जबाबदार धरले. दरम्यान, पांडियन यांच्यावरील होणाऱ्या टीकेनंतर नवीन पटनायक स्वत: पांडियन यांच्या बचावासाठी पुढे आले आणि त्यांनी पांडियन यांच्यावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचे म्हटले. एक अधिकारी म्हणून त्यांनी अनेक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले, गेल्या 10 वर्षांत आपल्या राज्यात दोन मोठ्या चक्रीवादळे आणि कोविड-19 महामारीमध्ये मदत केली, असे असताना त्यांच्यावर टीका होणे दुर्दैवी” असल्याचे बीजेडी सुप्रिमो म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)