Vishwakarma Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा देशभरात शुभारंभ, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये 'पीएम विश्वकर्मा' योजनेच्या शुभारंभाच्या वेळी मोदींनी 18 पोस्ट तिकिटे आणि टूलकिट बुकलेट लाँच केले.

Narendra Modi | (Photo credit: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 'पीएम विश्वकर्मा योजना' लागू करण्यात आली. उल्लेखनिय म्हणजे विश्वकर्मा जयंती (Vishwakarma Jayanti) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस (PM Narendra Modi 73rd birthday) या दोन्हीचे औचित्य साधत या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेची घोषणा पंतप्रधानांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनी (77th Independence Day लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना केली होती. द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये 'पीएम विश्वकर्मा' योजनेच्या शुभारंभाच्या वेळी मोदींनी 18 पोस्ट तिकिटे आणि टूलकिट बुकलेट लाँच केले.

'पीएम विश्वकर्मा' योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये

दरम्यान, आज पंतप्रधानांचा वाढदिवस असल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे सहकारी आणि अमित शहा आणि एस जयशंकर यांसारख्या मंत्रिमंडळ सदस्यांसह अनेक नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.