विजय माल्ल्याच्या हेलिकॉप्टर्सचा लिलाव, ही आहे किंमत

विजय मल्ल्याच्या लंडनमधील हवेली जप्त करण्याची लक्षणे दिसत असतानाच आयकर विभागाच्या या निर्णयामुळे मल्ल्याला आणखी एक झटका बसला आहे.

फाईल फोटो (Photo credits: PTI)

बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून भारतातून पसार झालेल्या विजय मल्ल्याची दोन हेलिकॉप्टर्स आयकर विभागाने विक्रीस काढली आहेत. विजय मल्ल्याच्या लंडनमधील हवेली जप्त करण्याची लक्षणे दिसत असतानाच आयकर विभागाच्या या निर्णयामुळे माल्ल्याला आणखी एक झटका बसला आहे. या दोन हेलिकॉप्टर्सची किंमत 8 कोटी इतकी आहे.

कर्ज न फेडल्यास माल्ल्याच्या लंडनमधील हवेलीचा ताबा मिळावा म्हणून यूबीएस एजी या स्विस बँकेने ब्रिटनच्या हायकोर्टात दावा दाखल केला होता. त्यानंतर आयकार विभागाचा हेलिकॉप्टर्स लिलावाचा निर्णय. यामुळे कर्जबुडव्या मल्ल्याच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. आयकर विभागाने मंगळवारी वृत्तपत्रात जाहिरात दिली असून मल्ल्याच्या दोन हेलिकॉप्टर्सचा लिलाव केला जाणार आहे.

जाहिरातीनुसार, चर्चगेटमधील एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनीच्या कार्यलयात हा लिलाव होणार आहे. लिलावात भारतीय चलनात बोली लावाली लागणार आहे. 9 नोव्हेंबरला ही लिलाव प्रक्रीया होणार असून 3 नोव्हेंबरला इच्छुकांना जुहू विमानतळावर हेलिकॉप्टर्सची पाहणी करता येणार आहे.

एअरबस हेलिकॉप्टर्स एच155 बी 1 या श्रेणीतील ही दोन हेलिकॉप्टर्स आहेत. विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्स लिमिटेडकडे ही हेलिकॉप्टर्स होती. सध्या ती दोन्ही हेलिकॉप्टर्स जुहू विमानतळावरील मेस्को हँगर्समध्ये ठेवण्यात आली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement