Vijay Mallya कडून पुन्हा भारत सरकारला 100% कर्जाचे हप्ते स्वीकरत त्याच्या विरूद्धची केस बंद करण्याबाबत विनंती
भारतीय बँकांचे कोट्यावधी पैसे बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya)याने आता भारत सरकारला पत्र लिहून 100% कर्जाची रक्कम परत करतो, केस बंद करा अशी मागणी केली आहे.
भारतीय बँकांचे कोट्यावधी पैसे बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya)याने आता भारत सरकारला पत्र लिहून 100% कर्जाची रक्कम परत करतो, केस बंद करा अशी मागणी केली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजचं कौतुक देखील केले आहे. यापूर्वीदेखील विजय मल्ल्याने भारत सरकारकडे 100% कर्ज फेडण्याबाबत पत्रव्यवहार झाल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
विजय माल्ल्यावर सुमारे 9000 कोटींचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. दरम्यान मागील वर्षांपासून तो भारतामधून पळून लंडनमध्ये वास्तव्याला आहे. तेथून लवकरच त्याचा ताबा भारताला मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहे. विजय माल्या चे नवे ट्विट; 'कर्जाची 100% रक्कम परत देण्याची तयारी होती मात्र बँक आणि ED ऐकत नाही' म्हणत केला मोठा दावा
विजय मल्ल्या ट्वीट
भारताला विजय मल्ल्याचा ताबा पुन्हा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असताना लंडनच्या कोर्टाकडून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून जामीन मिळवण्यात त्याला यश आलं आहे. मल्ल्या वारंवार भारत सरकारसह ईडी आणि अन्य संस्थांना पैसे कोणतीही अट न घालता स्वीकारा आणि केस बंद करा अशी ऑफर देत आहे. दरम्यान काल भारताच्या अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये लघू आणि मध्यम उद्योजकांना सावरण्यासाठी मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे.