Twitter ने सुधारली आपली चुक, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या अकाउंटवरुन हटवण्यात आलेले Blue Tick पुन्हा दिले
त्यामुळे नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ब्लू टिक (Blue Tick) हटवण्यात आली.
सोशल मीडियातील मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांचे खासगी अकाउंट Unverified केले आहे. त्यामुळे नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ब्लू टिक (Blue Tick) हटवण्यात आली आहे. ही बातमी समोर येताच ट्विटरवर Vice President Of India ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. युजर्सकडून ट्विटरच्या या कारमान्यावर विरोध दर्शवला आहे. ब्लू टिक हटवण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.(Milkha Singh Health Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून मिल्खा सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस, किरेन रिजिजू यांनी केले कौतुक (See Tweet)
भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी प्रश्न उपस्थितीत करत असे म्हटले की, ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या अकाउंटवरील ब्लू टिक का हटवले? हा भारताच्या संविधानावर करण्यात आलेला हल्ला आहे. दरम्यान, काही लोकांनी दावा केला आहे की त्यांचे अकाउंट अॅक्टिव्ह नसावे त्यामुळे ते अनवेरिफाइड करण्यात आले आहे.('अबकी बार करोडो बेरोजगार', काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल)
Tweet:
आता ट्विटरकडून आपली चूक सुधारण्यात आली असून नायडू यांच्या अकाउंटला पुन्हा एकदा Blue Tick दिली गेली आहे.
तर ट्विटर अकाउंट अॅक्टिव असणे म्हणजे तुम्ही त्याचा सातत्याने वापर करत असता. पण एका युजर्सने सोशल मीडियात लिहिले की, भारताचे उपराष्ट्रपती यांनी 23 जुलै 2020 रोजी नंतर एकही ट्विट केलेले नाही. याचा अर्थ असा होतो की, त्यांचे अकाउंट गेल्या 10 महिन्यांपासून निष्क्रिय आहे. ट्विटरच्या नियमांनुसार, ब्लू टिक स्वचालित रुपात निष्क्रिय अकाउंटवरुन हटवले जातात. यासाठीच उपराष्ट्रपती यांच्या अकाउंटवरुन ब्लू टिक हटवले आहे.