हैदराबाद: महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर जीवंत जाळल्याने देशभरातून संतापाची लाट
या प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच ट्वीटरवर सुद्धा #RIPPriyankaReddy ट्रेन्ड करत आहेत.
हैदराबाद येथील महिला डॉक्टर हिच्यावर बलात्कार केल्यानंतर जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच ट्वीटरवर सुद्धा #RIPPriyankaReddy ट्रेन्ड करत आहेत. पीडित महिलेसोबत नराधामांनी केलेल्या प्रकारावर राग व्यक्त केला जात असून तिच्यासोबत झालेल्या कृत्यावर न्याय मिळावा याची मागणी केली जात आहे.
पीडित महिला डॉक्टर हिच्यासोबत घडलेल्या गैरप्रकारावर देशभरातून तिला पाठिंबा दिला जात आहे. तसेच कॅन्डल मार्च सुद्धा काढण्यात येणार आहे. या दरम्यान प्रियंका हिने तिच्या हत्येपूर्वी बहिणीला फोन करुन तिच्यासोबत बातचीत केली होती. यामध्ये प्रियंकाने मला कोणत्यातरी गोष्टीची भीती वाटत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पीडित तरुणीचा फोन स्विच ऑफ दाखवण्यात आला. अखेर तिचा जळालेला मृतदेह हैदराबादच्या बाहेर असणाऱ्या एका परिसरातील भुयारी मार्गाजवळ हाती लागला.(धक्कादायक! सकाळी नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर, रात्री सासरा व नातेवाईकांनी केला सुनेवर सामुहिक बलात्कार)
मॅकानिक शमसेर आलम याने या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास पीडित महिलेची स्कुटी घेऊन तरुण आला. त्याने तिची स्कुटी तिथेच सोडून निघून गेला. पोलिसांनी पीडित महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सु्द्धा आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पशु चिकित्सक पीडित महिला डॉक्टर बुधवारी कोल्लरु येथील पशु चिकित्सालयात गेली होती. तेथेच नजीक असलेल्या शादनगर टोल नाक्यावर तिची स्कुटी पार्क केली. रात्री जेव्हा महिला तेथे आली त्यावेळी स्कुटी पंक्चर झाली होती. यावर तिने प्रथम बहिणीला फोन लावला आणि याची माहिती दिली. या बोलण्याच्या दरम्यान तिने बहिणीला मला भीती वाटत असल्याचे ही म्हटले. यावर बहिणीने तिला टॅक्सीने घरी येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने काही लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी तिचा टोल प्लाझा येथे शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेचा जळालेला मृतदेह भुयारी मार्गाचा येथे आढळून आला.