Vantara Project: अनंत अंबानीने सुरु केला 3 हजार एकरवर पसरलेला 'वनतारा' प्रकल्प; हत्तींपासून वाघापर्यंत 2000 प्राण्यांना मिळणार निवारा, जाणून घ्या सविस्तर
अनंत अंबानी म्हणतो, कोविड काळात वन्यजीव बचाव केंद्र सुरू करण्यात आले. जखमी जनावरांचे तात्काळ संरक्षण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, मग ते देशात असो वा परदेशात. त्याने सांगितले की जखमी प्राणी जगातील सर्वोच्च प्राणीशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने बरे होतात. रेस्क्यू सेंटरमध्ये जे लोक पशुवैद्यकीय पदवीधर आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या जातात.
Anant Ambani’s Vantara Project: मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. त्यांचा प्री-वेडिंग सोहळा 1 ते 3 मार्च या कालावधीत जामनगर येथे होणार आहे. याआधी अनंत अंबानीच्या वनतारा (Vantara) प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. वनतारा म्हणजेच स्टार ऑफ द फॉरेस्ट हा जखमी-शोषित वन्यप्राण्यांचे बचाव, उपचार आणि पुनर्वसन करण्याचा उपक्रम आहे. अनंत अंबानी याचे प्राण्यांबद्दलचे प्रेम सर्वदूत आहे. त्याला लहानपणापासून प्राण्यांबाबत विशेष माया आहे, म्हणूनच त्याने साधारण 3000 एकरमध्ये पसरलेला वनतारा प्रकल्प सुरु केला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने सोमवारी जामनगरमध्ये प्राणी कल्याणासाठी वनतारा उपक्रम सुरू केला. हा वनतारा इनिशिएटिव्ह जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये 3000 एकरमध्ये पसरलेला आहे. येथे प्राण्यांचे बचाव आणि पुनर्वसन केंद्र 650 एकर जागेवर बांधले आहे. वनतारा उपक्रमांतर्गत आतापर्यंत 2000 हून अधिक हत्ती आणि हजारो पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय वनतारामध्ये मगरी, बिबट्या, गेंडा या प्रमुख प्रजातींच्या पुनर्वसनाची व्यवस्थाही आहे.
वनतारा इनिशिएटिव्ह भारतातील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान, नागालँड प्राणीशास्त्र उद्यान, सरदार पटेल प्राणी उद्यान आणि आसाम राज्य प्राणीसंग्रहालय इत्यादींशी सहयोग करते. वनतारा प्रोग्रामने व्हेनेझुएलन नॅशनल फाऊंडेशन ऑफ झू यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही काम केले आहे. हे स्मिथसोनियन आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूस अँड एक्वेरियम सारख्या सुप्रसिद्ध संस्थांशी देखील संलग्न आहे. (हेही वाचा: UAE मधील 900 कैद्यांच्या सुटकेसाठी भारतीय उद्योगपतीकडून 2.5 कोटी रुपयांची देणगी, वाचा सविस्तर)
अनंत अंबानी म्हणतो, कोविड काळात वन्यजीव बचाव केंद्र सुरू करण्यात आले. जखमी जनावरांचे तात्काळ संरक्षण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, मग ते देशात असो वा परदेशात. त्याने सांगितले की जखमी प्राणी जगातील सर्वोच्च प्राणीशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने बरे होतात. रेस्क्यू सेंटरमध्ये जे लोक पशुवैद्यकीय पदवीधर आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. येत्या 3-4 वर्षांत त्यांच्याकडे वन्यजीव पशुवैद्यकीय औषधांसाठी पूर्ण विद्यापीठ असेल. वनतारा हा प्राण्यांना समर्पित अशा प्रकारचा देशातील पहिला कार्यक्रम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)