Uttar Pradesh: धडधाकट तरुणाचे लिंग कापले; दोन 'तृतीयपंथी' व्यक्तिंवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित तरुणाच्या बहिणीने अलीगढ येथील देहली गेट पोलीस स्थानगात तक्रार दिली आहे
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अग्रा येथील एका युवकाला जबरदस्तीने तृतीयपंथी (Kinnar) करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणाच्या बहिणीने अलीगढ येथील देहली गेट पोलीस स्थानगात तक्रार दिली आहे. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, परिसरातीलच काही तृतीयपंथी मोहम्मद राजी आणि गुड्डी यांनी मिळून आपल्या भावाचे लिंग कापून त्याला जबरदस्तीने तृतीयपंथी (किन्नर) बनविण्याचा प्रयत्न केला. या तृतीयपंथीयांसोबत एका कार्यक्रमात ढोल विजविण्यासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपला भाऊ या तृतीयपंथीयांसोबत कार्यक्रमाला गेला होता. परंतू, तो बराच काळ घरी परत आला नाही. त्यानंतर शोधाशोध केल्यानंतर एका रस्त्यावर तो लिंग कापलेल्या आणि रक्ताने माकलेल्या अवस्थेत आढळून आला.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री सुमारे 10 वाजणेच्या सुमारास पीडित तरुणाचे कुटुंबीय आणि त्यांच्या शेजाऱ्यांना घटनेबाबत माहिती कळली. एक तरुण जखमी अवस्थेत गोंडा रोड येथे पडला आहे. कुटुंबीयांनी गोंडा रोड परिसरात धाव घेतली असता हा तरुण आपल्याच घरातील व्यक्ती असल्याची खात्री कुटुंबीयांना पटली. त्यानंतर त्यांनी या तरुणाला रुग्णालयात दाखल केल. उपचारानंतर तरुणाची स्थिती काहीशी स्थिर झाल्यानंतर त्याला देहली गेट पोलीस ठाण्यात नेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा, Snake Bite To Penis: युवकाचे लिंग सर्पदंश झाल्याने दुखावले, त्याच्या जखमेवर डॉक्टरांनी तीन टाके घातले, बँकॉक येथील घटना)
पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, ही घटना घडली त्या दिवशी मला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर माझे गुप्तांग कापून त्या ठिकाणी टाके घालण्यात आले. युवकाने सांगितले की, मला बेशुद्ध न करता टाके घालण्यात आले. प्रचंड वेदनेमुळे मी बेशूद्ध झालो. त्यानंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी त्या खोलीतून कसाबसा बाहेर पडलो. दरम्यान, पोलिसांनी पीडित तरुणाला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यातील अधिकारी राघवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आोरपींनी हे पाऊल नेमके का उचलले याची माहिती प्रत्यक्ष तपासानंतरच समजू शकते. प्राथमिक अंदाजानुसार तर हे प्रकरण जबरदस्तीने तृतीयपंथी बनविण्याचे दिसत आहे.