Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशमध्ये 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, टीव्ही पाहण्याचे आमिष दाखवून आरोपीचे कृत्य; बुलंदशहर येथील घटना

अवघ्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या खळबळजनक घटनेमुळे परिसर हादरुन गेला आहे. ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा नगर ( Khurja Nagar) परिसरातील एका गावात घडली.

Stop Rape (Representative image)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahr) येथे धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या खळबळजनक घटनेमुळे परिसर हादरुन गेला आहे. ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा नगर ( Khurja Nagar) परिसरातील एका गावात घडली. आरोपीने या मुलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. आमच्या सहाय्यक पोर्टलने इंडिया टुडेचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.

प्राप्त महिती अशी की, अल्पवयीन मुलगी रस्त्यावर खेळत होती. आरोपीने तिला घरी जाऊन टीव्ही पाहण्याचे आमिश दाखवले. तो तिला घेऊन त्याच्या घरी गेला. तिथे जाऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आरडाओरडा ऐकताच शेजारच्याच घरात राहात असलेली तिची आई धावत आली. तिने मुलीची सुटका केली. त्यानंतर झालेल्या दंग्यामुळे परिसरातील नागरिकगी घटनास्थळी जमा झाले. (हेही वाचा, विकृतीचा कळस! वडिलांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलासोबत ठेवले 'अनैसर्गिक संबंध', नंतर गळा दाबून केली हत्या- Report)

दरम्यान, गोंधळाची स्थिती पाहून आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, स्थानिकांनी त्याला लगेचच पकडले. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर आरोपीविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, अशीच एकदुसरी घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. या घटनेत छत्तीसगडच्या एका गावात चार जणांनी एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. प्रकरण जातपंचायतीत गेले. पंचायतीने दोषींना तिला 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश देऊन प्रकरण मिटवीण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

जशपूर जिल्ह्यातील कानसाबेल पोलीस स्टेशन परिसरात 9 जुलै रोजी घडलेल्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वत: कारवाई करत सोमवारी आरोपीला अटक केली. ही घटना जशपूर जिल्ह्यात घडली. 9 जुलै रोजी घडलेल्या या घटनेची माहिती कानसाबेल पोलीस स्टेशन कळताच पोलिसांनी स्वत: कारवाई करत आरोपीला सोमवारी अटक केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif