उत्तरप्रदेश: लग्नाच्या पहिल्याच रात्री सासरच्या मंडळींना वाढले स्वत:च्या हातचे जेवण, त्यानंतर काय झाले वाचा सविस्तर
मात्र वधूने जेवण खाऊ घातल्यानंतर जो प्रकार घडला तो पाहून सासरच्या मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका नवविवाहित वधूने लग्नाच्या पहिल्या रात्री सासरच्या मंडळींना स्वत:च्या हाताने बनवलेले चमचमीत जेवण वाढले. मात्र वधूने जेवण खाऊ घातल्यानंतर जो प्रकार घडला तो पाहून सासरच्या मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या. तसेच वधूने त्यांच्यासोबत केलेल्या वर्तनामुळे तिच्यावर अविश्वास ठेवणे प्रथम सासरच्या मंडळींना पटले नाही.
सिव्हिल लाईन्स येथील परिसरातील संजय हा वर एका हॉटेलमध्ये काम करतो. तसेच संजय याचे लग्न नुकतेच 2 ऑगस्ट रोजी पार पडले. घरात नववधू आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तसेच वधूने चक्क लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरातील मंडळींना हाताने जेवण बनवून वाढल्याने तिचे फार कौतुक करण्यात आले. मात्र जेवण खाऊन झाल्यावर घरातील मंडळी झोपायची वेळ झाली म्हणून झोपले खरे. पण या नववधूने त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून त्यांना हे जेवण वाढले होते.(धक्कादायक! पैसे संपले म्हणून बायकोवर लावला जुगाराचा डाव; हरल्यावर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार; तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा नकार)
या सर्व प्रकारानंतर वधूने घरातील पैसे आणि सोने लुटून पळाल्याचा धक्कादायक प्रकार सासरच्या मंडळींना सकाळी उठल्यावर दिसून आला. या प्रकरणी आरोपी महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच महिलेने लग्न करण्यापूर्वी मी एका गरीब घरातून असल्याने सासरच्या मंडळींकडून 30 रुपयांची रोकड सुद्धा घेतल्याचे पीडित कुटुंबियांनी पोलसांना सांगितले आहे.