Uttar Pradesh Hand Pump Dispute: उत्तर प्रदेशमध्ये हातपंप ठरला वादग्रस्त, राजकारणही रंगले

आता मात्र हातपंप चर्चेत आला आहे तो म्हणजे स्थानिक प्रशनाला सांप्रदायीक वळण मिळाल्याने. घटना आहे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील सहानपूर येथील.

Hand pump| Photo Credits: Pixabay.com)

सनी देओल (Sunny Deol) अभिनीत 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar: Ek Prem Katha) चित्रपटानंतर पुन्हा एकदा हातपंप (Hand Pump) जोरदार चर्चेत आला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटात सनी दओलने हाताने हातपंप उपसला होता. आता मात्र हातपंप चर्चेत आला आहे तो म्हणजे स्थानिक प्रशनाला सांप्रदायीक वळण मिळाल्याने. घटना आहे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील सहानपूर येथील. सहानपूर येथील मनिहारन बाजार परिसरात असलेला हातपंप दुकानदार पंडित मुरारी झा यांच्या मागणीवरुन अधिकाऱ्यांनी हटवला. प्राप्त माहितीनुसार, हा हातपंप मुरारी झा यांच्या दुकानासमोर होता. हे दुकान गेली चार वर्षे बंद होते. हे दुकान मुरारी झा आता पुन्हा उघडू इच्छित आहेत. दरम्यानच्या काळात दुकानासमोर हातपंप लगावण्यात आला होता.

मुरारी झा यांच्या म्हणण्याप्रमाणे हातपंप दुकानाच्या प्रवेशद्वारावर आहे. त्यामुळे दुकानात प्रवेश करताना हातपंप अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा हातपंप हटवणे आवश्यक होते. अधिकाऱ्यांनी हातपंप हटवताच स्थानिक समुदयाने जोरदार विरोध केला. हा हातपंप परत लावण्याची मागणी केली. (हेही वाचा,गर्लफ्रेंड च्या लग्नात साडी नेसून, मेकअप करुन 'तो' पोहचला खरा पण, नातेवाईकांनी ओळखलचं त्या नंतर काय घडले ते तुम्हीच पाहा (Watch Viral Video) )

दरम्यान, नदीम खान नामक व्यक्तीने जलस्त्रोत ठरणारा हा हातपंप परत लावण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हिंदुंसह दुकान मालकालाही हा हातपंप एक जलस्त्रोत होता. दरम्यान, हा हातपंप आता एक प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. निवेदन देताना खान यांनी म्हटले आहे की, आम्ही हातपंपाची दिशाही बदलली होती. तरीही हा हातपंत हटविण्यात आला आहे. हातपंप हटवल्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर तणाव काही प्रमाणात निवळला.

दरम्यान, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आमदारांनी विरोधात आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा हातपंप बसविण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी काही मंडळींनी हनुमान चालीसाही पठण केल्या. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटले की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. हातपंप खरोखरच दुकानास अडथळा ठरतो आहे का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif