UttarPradesh: कारागृहातील कैद्यांवर आता 24 तास सीसीटीव्हीद्वारे लक्ष्य
कारागृहातून चालणारी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी आता उत्तर प्रदेश सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत.
उत्तर प्रदेश सरकार (Uttar Pradesh) आता ३० तुरुंगातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजवर चोवीस तास लक्ष ठेवणार आहे. देखरेखीसाठी या कारागृहांमध्ये (Jail) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत आणि त्यात आता अपग्रेड करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील कारागृहात बंदिस्त गुन्हेगार आणि त्यांच्या साथीदारांच्या कारवायांवर नजर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आमदार अब्बास अन्सारी (Abbas Ansari) यांच्याशी संबंधित अलीकडील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अब्बास अन्सारी जो चित्रकूट तुरुंगात त्याची पत्नी निखत बानोला नियमितपणे भेटत होता आणि त्याच्या केसमधील साक्षीदारांना धमकावत होता. या घटनेनंतर अन्सारीला दुसऱ्या कारागृहात पाठवले असून त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
कारागृहातून होणाऱ्या गुन्हांवर अंकुश लावण्यासाठी जेल प्रभारीद्वारा ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश गृह विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांचे स्पष्ट निर्देश आहे की जेल प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी पडायचे नाही आणि जर कोणी धमकी दिलीच तर त्यांची तक्रार मुख्यालयात नोंदवावी, जेणेकरुन आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
कारागृहाचे प्रधान सचिव राजेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील सर्व तुरुंगांच्या अधीक्षकांना कारागृहात बंद असलेल्या टॉप टेन गुन्हेगारांची यादी मुख्यालयाला देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. कैद्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्यातील कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच कारागृहात बनवल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांची यादीही मुख्यालयाला पाठवावी.