उत्तर प्रदेश येथे 6 वर्षीय मुलगी 60 फूट खोल बोअरवेल मध्ये पडली, पोलिसांकडून बचाव कार्य सुरु

उत्तर प्रदेश (Utter Pradesh) येथे एक सहा वर्षीय मुलगी 60 फूट खोल असणाऱ्या बोअरवेल मध्ये पडल्याची घटना घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उत्तर प्रदेश (Utter Pradesh) येथे एक सहा वर्षीय मुलगी 60 फूट खोल असणाऱ्या बोअरवेल मध्ये पडल्याची घटना घडली आहे. तर कालपासून या बोअरवेलमधून या मुलीचा आवाजसुद्धा ऐकू न आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली आहे. परंतु पोलीस दल, एनडीआरएफ आणि एसडीआरफ टीम घटनास्थळी पोहचल्या असून त्यांनी बचाव कार्य सुरु केले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सीमा असे या मुलीचे नाव असून ती रशीदपूर गावात राहते. पाण्याचे नियोजन योग्यरितीने होण्यासाठी तेथे पाण्याचा पाईप टाकण्यासाठी खड्डा खणण्यात आला होता. तसेच या बोअरवेलच्या आजूबाजूला कोणत्याही पद्धतीच्या सुरक्षिततेची माहिती देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर सीमा दुपारच्या वेळेस या बोअरवेल नजीक खेळत असताना ती अचानक 60 फूट खोल पडली. मात्र त्यावेळी तेथील कामगार जेवण करण्यासाठी गेले होते.(हेही वाचा-दिल्ली पोलीस खात्यामधील ASI ने धावत्या मेट्रोसमोर उडी टाकत केली आत्महत्या)

तर डॉक्टरांकडून बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलीला पाईपच्या मदतीने ऑक्सिजन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कालपासून या मुलीचा रडण्याचासुद्धा आवाज ऐकू आला नसला तरीही तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.