दाजीची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आतेबहिणीसह, भाचीवर बलात्कार, घटनेचा Video काढून मोबाईल फेकला नदीत
Rape | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील आजमगढ (Azamgarh) जिल्ह्यात एक धक्कादाय घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या वासनांधपणा आणि क्रुरतेचा भयावह चेहरा दाखवला आहे. या व्यक्तीने पहिल्यांदा आपल्या दाजीची दगड, विटांनी ठेचून हत्या केली. त्यानंतर आपल्या आतेबहिण आणि भाचीला आपल्या वासनेची शिकार बनवले. धक्कादायक म्हणजे आरोपीने या क्रूर घटनेचा व्हिडिओही तयार केला. त्याच्या कृत्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक नाराज झाले. त्यामुळे या व्यक्तीने आपला व्हिडिओ नदीत फेकला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुबारकपूर पोलीस स्टेशन हद्दीत 24 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या अंधारात घडली. मुबारकपूर येथे एक तरुण आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत राहात होता. त्याला 10 वर्षे 4 महिन्यांचा मुलगा, दोन वर्षांची मुलगी आणि 4 वर्षांच्या मुलगा अशी ती अपत्ये आहेत. 24 नोव्हेंबरच्या रात्री या दोघा पतीपत्नीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली. तर, या दाम्पत्याचा मोठा मुलगा या घटनेत गंभीर जखमी झाला. सुरुवातीला हे प्रकरण दरोडा किंवा चोरीचे असावे असा पोलिसांचा संशय होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण चोरी अथवा दरोड्याचे नसल्याचे पुढे आले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बलात्काराच्या दृष्टीकोनातून केला. तपास सुरु असताना पोलिसांच्या एक गोष्ट ध्यानात आली की, गेले काही दिवस ही घटना घडलेल्या गावातील एक तरुण घराबाहेर पडणे टाळत आहे. परंतू, तो या घटनेत मृत्यू झालेल्या दाम्पत्याच्या समाधीजवळ रात्रीच्या वेळी जरुर जातो. महत्त्वाचे म्हणजे ही घटना घडली तेव्हा हा तरुण घटनास्थळावर हजर होता. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलीने शुद्धवर आल्यानंतर या तरुणाचेच नाव घेतले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिस तपासात पुढे आलेली माहिती अशी की, आरोपी हा मृत व्यक्तीचा मेहुणा आहे. या तरुणाने 24 नोव्हेंबरच्या रात्री घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्याने आपल्या दाजीची दगड आणि विटांनी मारहाण करत हत्या केली. त्यानंत त्याने आपल्या बहिणीला (दाजीची बायको) गंभीर जखमी केले. ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना आरोपीने तिच्यासोबत दोन वेळा बलात्कार केला. त्यानतर त्याने आपल्या भाचीसोबतही बलात्कार केला. इतके क्रौर्याने वागल्यानंतरही नराधम थांबला नाही. त्याने दोन लहान मुलांनाही गंभीर जखमी केले. (हेही वाचा, जालोरमध्ये नात्याला काळिमा; पोटच्या मुलीला साखळदंडाने बांधून पित्याचा अनेकवेळा बलात्कार)

सांगितले जात आहे की, आरोपीने या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. हा व्हिडिओ तब्बल 3 तासांचा आहे. ही घटना घडल्यावर आरोपी आपल्या घरी गेला. त्याने हा व्हिडिओ आपल्या वहिणीला दाखवला. तो व्हिडीओ पाहून घरातल्यांना धक्काच बसला. घरातले लोक त्याला रागे भरले. त्यानंतर त्याने आपला फोन नदीत फेकला. आजमगढ एसपी प्रोफेसर त्रिवेणी सिंह यांनी म्हटले आहे की, डेटा एनालिटिक्स आणि स्निफर डॉग च्या मदतीने या प्रकरणाचा खुलासा झाला. आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात धक्कादायक घटना असेही या घटनेचे वर्णण त्रिवेणी सिंह यांनी केले आहे.