UPTET Exam 2021: पेपर लीक झाल्यानंतर युपी TET ची परीक्षा रद्द, आता एका महिन्यानंतर होणार एग्जाम

कारण ही परीक्षा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळजवळ 21 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

Representational Image. (Photo Credits: PTI)

UPTET Exam 2021: उत्तर प्रदेशात आज होणाऱ्या UP TET ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. कारण ही परीक्षा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळजवळ 21 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. असे सांगितले जात आहे की, पेपर लीक झाल्याने आता एका महिन्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. या प्रकरमी काही लोकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.(Punjab: पगारासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे शोले स्टाइल आंदोलन, फाईल क्लिअर होईपर्यंत मोबाईल टॉवरवर मांडला निवारा)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सॉल्व्हर टोळीशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी एसटीएफने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हॉट्सअॅपवर पेपर लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा येथील व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षेचा पेपर व्हायरल झाला, त्यानंतर परीक्षा रद्द करावी लागली. त्याचबरोबर आता महिनाभरानंतर पुन्हा ही परीक्षा होणार आहे. मात्र, यासाठी अर्जदारांना पुन्हा शुल्क भरावे लागणार नाही.(CBSE बोर्डाचा दिलासा; परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही)

Tweet:

दरम्यान, परीक्षेपूर्वी पेपर फुटल्यामुळे UP TET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार होती. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते 12.30 अशी होती. दुसरीकडे उच्च प्राथमिक स्तराची परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार होती. यावेळी UP TET साठी 21,62,287 उमेदवारांनी अर्ज केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif