नवऱ्याने Egg Curry बनविली म्हणून बायकोची आत्महत्या
फोटो सौजन्य- फाइल इमेज

उत्तर प्रदेशामध्ये बुधवारी एका महिलेने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमागील कारण शुल्लक असून महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नोएडा येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने जेवणासाठी भाजी बनविली होती. परंतु नवऱ्याला आणि त्याच्या भावाला बायकोने बनविलेले भाजी नको झाल्याने त्यांनी अंडा करी(Egg Curry) बनविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे नवऱ्याने स्वयंपाक घरात जाऊन अंडा करी बनविण्यास सुरुवात केली. मात्र बायकोला नवऱ्याने आपण बनविलेली भाजी नको झाल्याने तो अंडा करी बनवत अल्याचा राग आला. या रागाच्या भरात बायकोने घराबाहेर जाऊन इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन उडी टाकत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांनी या घटनेची पूर्णकल्पना दिली आहे. तसेच पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असून अद्याप कोणाला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.