UP: वादग्रस्त भाषण दिल्याने फसले असुद्दीन औवेसी, कोरोनाच्या नियमांचे सुद्धा केले उल्लंघन

खरंतर बाराबाकी मध्ये वादग्रस्त भाषण देण्याच्या आरोपाखाली औवेसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Asaduddin Owaisi (Photo Credit: ANI)

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खरंतर बाराबाकी मध्ये वादग्रस्त भाषण देण्याच्या आरोपाखाली औवेसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त औवेसी यांच्यावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यासंदर्भात ही कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, युपीच्या दौऱ्यावर आलेल्या औवेसी यांनी गुरुवारी बाराबांकीच्या कटरा परिसरात एक जनसभेला संबोधित करत होते.

लोकांना संबोधित करताना औवेसी यांनी म्हटले की, बाराबाकी मध्ये रामसनेहीघाट मधील 100 वर्ष जुन्या मस्जिदीला बरखास्त करण्यात आले. एक एसडीएम द्वारे करण्यात आला कारण त्यांना अजान आवडत नसे. हा खेळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. याच दरम्यान, भाजपमध्ये सुद्धा बदल होणार होता. योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री पद काढून घेण्यात येणार होते. तर त्या बाबाने एसडीएमला पुढे करुन मस्जिद बरखास्त केले. एसडीएमवर कार्यवाही करण्याऐवजी सीडीओ बनवले.

औवेसी यांनी पुढे असे म्हटले की, भाजपचे योगी आणि मोदी सरकार धर्मनिरपेक्षता कमकुवत करण्याचे कार्य करत आहेत. पीएम मोदी हळूहळू देशाचे हिंदू राष्ट्रात रूपांतर करण्याची तयारी करत आहेत.(Nand Kumar Baghel Arrested: छत्तीसडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल यांना अटक)

ओवेसींनी सपा आणि बसपावरही टीका केली. ओवेसी म्हणाले की, या पक्षांनी कधीही मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवला नाही. या लोकांनी मुस्लिमांची मते घेतली आहेत पण त्यांची कधी पर्वा केली नाही. या पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि तिहेरी तलाकला विरोध केला नाही.