देशभरातील धार्मिक स्थळे आजपासून खुली, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा येथे नागरिकांनी केली प्रार्थना- पहा फोटो आणि व्हिडिओ

केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना जाहीर करत धार्मिक स्थळ, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, ऑफिसे सुरु करण्यास परवानगी दिली आहे

देशभरातील धार्मिक स्थळ सुरु (Photo Credits-ANI)

अनलॉक 1 (Unlock1)  नुसार आज देशभरातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना जाहीर करत धार्मिक स्थळ, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, ऑफिसे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्येक राज्यांनी त्यांच्यानुसार कोणत्या गोष्टी सुरु करण्यात येतील त्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याचसोबत काही राज्यात फक्त धार्मिक स्थळ सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. (Coronavirus Lockdown 5.0: सरकारकडून धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी पण गोव्यातील चर्च आणि मशीद आणखी काही काळ बंदच राहणार)

कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे जवळजवळ दोन महिन्यानंतर धार्मिक स्थळ पुन्हा सुरु झाली आहेत. परंतु धार्मिक स्थळ सुरु करण्यासोबत काही महत्वाची पाऊले सुद्धा उचलण्यात आली आहेत.(Coronavirus: देशात लॉकडाऊन शिथिल मात्र कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येचे आव्हान कायम)

पंजाब मधील स्वर्ण मंदिरात पुजा करण्यासाठी नागरिक पोहचले

दिल्लीतील फतेहपुरी मस्जिद सोमवारी सावधगिरी बाळगत पुन्हा सुरु

 

कर्नाटक: भाविकांनी कालाबुरारी येथे शरण बसवेश्वर मंदिरात दर्शन घेतले

 

गुजरात: इस्कॉन मंदिरात टोकन पद्धतीने नागरिकांना दर्शन घेता आले

Unlock 1 : अनलॉक १ च्या तिसऱ्या टप्प्यात 'या' गोष्टी आजपासून सुरु; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या - Watch Video

कर्नाटक: बंगळुरु मधील सेंट मेरी चर्च येथे प्रार्थना पार पडली

उत्तराखंड: देहरादून मध्ये माता वैष्णो देवी गुफा योग मंदिरात पूजा करण्यात आली

दिल्लीतील छतरापूर मंदिरात भक्तांनी पु्न्हा पूजा केली

सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सावधिगिरी बाळगण्यात येत आहे. मास्क घालण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे सुद्धा पालन केले जात आहे. धार्मिक स्थळांच्या येथे पवित्र गंथ्र, मुर्ति यांचा हात लावणे, पाणी दाखवणे, सामूहिक गायन आणि प्रसाद वाटण्यासारख्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तेथील गेटवरच हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यासह थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे.