National Recruitment Agency ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नॉन गॅझेट सरकारी आणि पब्लिक सेक्टर बॅंकेमधील पदांसाठी एकच CET परीक्षा

आता देशात सरकारी नोकरीसाठी, बॅंकांच्या नोकरीसाठी द्याव्या लागणार्‍या वेगवेगळ्या परीक्षा रद्द करून एकच कॉमन एन्टरन्स टेस्ट म्हणजे सीईटीची परीक्षा होईल

Union Minister Prakash Javadekar briefing media about cabinet decisions (Photo Credits: PIB)

भारतामध्ये National Recruitment Agency (NRA)ची स्थापना करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशात सरकारी नोकरीसाठी, बॅंकांच्या नोकरीसाठी द्याव्या लागणार्‍या वेगवेगळ्या परीक्षा रद्द करून एकच कॉमन एन्टरन्स टेस्ट (Common Entrance Test ) म्हणजे सीईटीची परीक्षा (CET Exams)  होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

NRA ला मंजुरी मिळाल्याने आता भारतामध्ये सुमारे 2.5 लाख नोकरीच्या शोधात असणार्‍यांना सरकारी आणि खाजगी संस्थांकडून द्याव्या लगणार्‍या विविध परीक्षांचा गोंधळ कमी होणार आहे. आता एकच सीईटी घेतली जाईल. त्याचे मार्क्स 3 वर्षांसाठी व्हॅलिड राहतील. याचा फायदा आता देशातील अनेक बेरोजगार आणि नव्या नोकरीच्या शोधात असणार्‍यांना होणार आहे. New Nationa Education Policy 2020: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे सूत्र 5+3+3+4.  

ANI Tweet  

National Recruitment Agency कशी असेल?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्यांदा NRA ची संकल्पना मांडली होती.